नाशिक

धुळे कोम्बिंग आॅपरेशन

CD
धुळे ः टुडे ३ साठी, सेकंडमेन -- लोगो छायाचित्र घेणे ः बेड्या -- कोंबिंग ऑपरेशनमध्ये तिघांना बेड्या - तीन गोवंशांची सुटका : पशुसंरक्षण, कामात अडथळ्याचा गुन्हा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३१ : गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर नातेवाईक आणि जमावाने हल्ला चढवत, त्याला बळजबरीने पोलिसांच्या तावडीतून पळवून नेल्याची धक्कादायक घटना गुरूवारी (ता. २९) वडजाई रोड परिसरात घडली. या घटनेनंतर मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखा आणि आझादनगर पोलिसांनी संपूर्ण परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवून आरोपीच्या मदतीला धावून आलेल्या तिघांना अटक केली. तसेच, एका ठिकाणाहून कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या तीन गोवंशांची सुटका केल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रशासनाने पत्रकाव्दाद्वारे दिली. - या प्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि महाराष्ट्र पशु संरक्षण कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आझादनगर पोलिस ठाण्यात दाखल ‘हाफ मर्डर’ आणि ‘आर्म्स ॲक्ट’सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी जब्बार शाह गुलाब शाह फकीर (रा. वडजाई रोड, धुळे) हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. त्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून त्याला तत्काळ अटक करण्याचा आदेश दिला. त्यानुसार गुरुवारी (ता. २९) रात्री आठच्या सुमारास आझादनगर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने जब्बार शाह याला नंदी रोडवरील पंताच्या टपरीजवळून ताब्यात घेतले. - महिलांची धक्काबुक्की पोलिस ताब्यात घेत असल्याचे दिसताच जब्बार शाह याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली आणि छातीत दुखत असल्याचा खोटा बनाव केला. त्याच्या आवाजाने त्याच्या कुटुंबातील महिला आणि नातेवाइकांनी घटनास्थळी गर्दी जमवली. तमन्ना शाह, मेहराज बानो शाह, हलीमाबी शाह, नजमाबी शाह, परवीनबी शाह या महिलांनी महिला पोलिस अंमलदारांशी धक्काबुक्की करत त्यांना धमकावले. आदिल शाह, जाकीर शाह, इकबाल शाह, अमन शाह, मुझमबील शाह, फकीरा शाह आणि रमजान शाह यांनी जमावाचा गैरफायदा घेत पोलिसांना रोखून धरले. आरोपी जब्बार हा उच्च न्यायालयाकडून जामीन फेटाळलेला फरार गुन्हेगार आहे हे माहीत असूनही सर्वांनी संगनमत करून पोलिसांवर हल्ला केला आणि जब्बारला पोलिसांच्या ताब्यातून जबरदस्तीने पळवून नेले. - गोवंशांची सुटका कोंबिंग ऑपरेशनदरम्यान संशयित शेख मुक्तार शेख नुरोद्दीन (वय ५३, रा. वडजाई रोड) याच्या घराची झडती घेतली असता, तेथे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवलेली तीन गोवंश जनावरे आढळली. पोलिसांनी या तिन्ही जनावरांची सुटका करून त्यांना पांझरापोळ गोशाळेत सुरक्षित हलवले आहे. या प्रकरणी शेख मुक्तारविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. - १४-१ ...चौकट... १४-१ मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन या थेट आव्हानानंतर पोलिस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांच्या मार्गदर्शनात ३० ऑक्टोबरला मध्यरात्री दोनच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा, आझादनगर पोलिस ठाणे आणि आरसीपीच्या ताफ्याने वडजाई रोड, काझी प्लॉट आणि शिवाजीनगर परिसरात ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवले. या कारवाईत पोलिसांवर हल्ला करून आरोपीला पळवून लावण्यात सहभाग असणाऱ्या रफीक शाह गुलाब शाह फकीर (वय ४९), मुज्जमील शाह रफीक शाह (१९), अमन शाह रफीक शाह (वय २५, सर्व रा. वडजाई रोड, काझी प्लॉट, धुळे) याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 5th T20I: शेवटचा सामन्यात होणार मोठे प्रयोग? वैभव सूर्यवंशी, कुलदीपला मिळणार Playing XI मध्ये संधी?

Marathi News Live Updates : गोकुळ दूध संघातर्फे उत्पादकांना ११७ कोटींची 'दिवाळी भेट'; अंतिम दूध दर फरक थेट बँक खात्यात जमा

Omer Abdullah: जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?

Foreign Deputy PM daughter Bollywood Ambition : "ते नेते माझ्या मागेच लागलेत!"; जगातील 'त्या' बलाढ्य देशाच्या उपपंतप्रधानांच्या मुलीला काम करायचंय बॉलिवूडमध्ये; केंद्रीय मंत्र्यांचा मोठा खुलासा

Mumbai News: पुनर्रोपणासाठी मुंबईत जागा आहे कुठे? पर्यावरणप्रेमींचा सवाल; पाच महिन्यांत ७,६३३ झाडे हटवण्यास परवानगी

SCROLL FOR NEXT