नाशिक

धगधगते धुळे ५

CD
धुळे ः टुडे ३ साठी, मेन -- लोगो क्रमांक ः 31267 -- वाढती गुन्हेगारी अन् तपासाची कार्यपद्धती चर्चेत! - वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दशा आणि दिशा तपासण्याची गरज; ‘एसपीं’च्या भूमिकेकडे लक्ष निखिल सूर्यवंशी : सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३ : जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात घडत असलेल्या गुन्हेगारी घटना, पोलिसांकडून गुप्त माहितीच्या आधारे होणारी कारवाई, नोंदविला जाणारा गुन्हा आणि काही काळाने गुन्ह्यात अडकलेले संशयित निधड्या छातीने मोकाट फिरताना दिसणे, या बाबी सामान्यांच्याच नव्हे तर अभ्यासकांच्या आकलनक्षमतेच्या पलीकडच्या आहेत. पोलिस प्रशासनाची कारवाई मग ती त्या-त्या पोलिस ठाण्याची असो की ‘एलसीबी’ची ती पाहता जिल्ह्यातील पोलिसांच्या कार्यपद्धतीची दशा आणि दिशा तपासण्याची वेळ आता वरिष्ठांवर आली आहे. गुन्हेगारीमुक्त आणि नशामुक्त भारताचे स्वप्न साकारण्याची जबाबदारी जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून विशाल आनंद कशी निभावतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. - गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यातील उंचावलेला गुन्हेगारीचा आलेख आणि त्याचवेळी पोलिस ठाणे तसेच ‘एलसीबी’कडून होत असलेली कारवाई, हे मुद्दे ठळकपणे पुढे येत आहेत. पोलिसांकडून कारवाई होत असतानाही गुन्हेगारीचा आलेख उंचावणे किंवा गुन्हेगारांचे निधड्या छातीने फिरणे, त्याचे कारण काय, असा प्रश्न निर्माण होतो. पोलिस अधीक्षकांनी याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊन तपासणी केली, तर त्यांना गुन्हेगारीचा आलेख का उंचावत आहे, याची काही कारणे हाती लागू शकतील, असे सांगितले जाते. त्यासाठी पोलिस यंत्रणेला गुन्हेगारी घटनेचा लागणारा मागोवा, त्याचवेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे दाखल होणारा गुन्हा आणि त्यानंतरच्या प्रक्रियेत गुन्हेगारांचे जामिनाद्वारे बाहेर पडणे, या गोष्टी तपासणे गरजेचे झाले आहे. - मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष? पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी गुन्ह्याची नोंद आणि तपासाबाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. पण, या मार्गदर्शक सूचनांना नजरेआड करून गुन्ह्याचा तपास आणि कागदपत्रांच्या नोंदी अशा काही विशिष्ट शैलीत केल्या जातात, की त्याचा फायदा प्रत्यक्ष गुन्हेगार आणि त्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अप्रत्यक्ष गुन्हेगारालाही मिळतो. जिल्ह्यात चोरीच्या घटनांशिवाय बनावट दारूनिर्मिती, बनावट ताडी, दारूची तस्करी, एमडी, तसेच भांग- गांजाची शेती आणि निरनिराळ्या अमली पदार्थांची विक्री या घटनांचा प्रभावीपणे बिमोड का केला जात नाही, असा प्रश्न आज अनेकांना पडला आहे. बनावट दारूसाठी जर खऱ्या बाटल्या वापरल्या जात असतील, तर त्या बाटल्यांवर चिटकविले जाणारे स्टिकर आणि बूच नेमके येतात कुठून, याचा शोध तपास यंत्रणा का घेत नाही? असे असताना गुन्हेगारीमुक्त आणि नशामुक्त भारताचे स्वप्न पाहणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या अनुयायांच्या पदरी निराशाच येईल, हे सांगण्यासाठी भविष्यवेत्त्याची गरज नाही. - १४-१ ...चौकट..बॉक्स... १४-१ चौकशीच्या फेऱ्यात असलेले ‘तपास’ * शिंदखेडा कफ सिरप प्रकरण : शिंदखेडा पोलिस ठाण्यात ३ जुलैला नशेखोरीसाठी वापरल्या जाणाऱ्या कोडीनयुक्त कफ सिरपच्या १६० बाटल्यांप्रकरणी गुन्हा दाखल झाला. या बाटल्यांचा मूळ स्रोत कुठून आणि कोणासाठी नेला जात होता, हा खरा तपासाचा भाग ठरतो. याबाबत पोलिस महासंचालकांच्या सूचनेनुसार ‘बॅकवर्ड- फॉरवर्ड लिंक’ जोडणे आवश्यक होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करत सुरतच्या मुख्य संशयिताला अभय देण्याचे कारण काय? * घरफोड्या आणि सराफांचे जाळे : पोलिसांनी सप्टेंबरमध्ये भादा टोळीतील तिघांसह सराफाला अटक करत बारा घरफोड्यांचा छडा लावला आणि १९ लाखांचे दागिने जप्त केले. त्यात पाचोऱ्याच्या सराफाकडे अर्धा किलो सोन्याची मागणी झाली होती. या कारवाईत पकडलेले सोने, त्याची गुणवत्ता, कमी कॅरेटचे दागिने बनवून घेत काही छेडछाड झाली आहे का, हे तपासले गेले पाहिजे. * गुलदस्त्यातील तपास : जळगाव तालुक्यातील गुन्हेगाराने सायने (ता. धुळे) येथून तीन लाखांचे सोने लंपास केले. त्या गुन्हेगाराचाही पाचोऱ्याच्या सराफाशी संबंध निघाला. मात्र, त्या सराफाचे पुढे काय झाले हे गुलदस्त्यात असून, फक्त त्या गुन्हेगाराला सोनगीर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. * ‘एमडी’बाबत संशय : धुळे शहरातील जयहिंद कॉलनी- कालिकामाता मंदीर परिसरात काही दिवसांपूर्वी एमडी या अमली पदार्थ प्रकरणी कारवाई झाली. मात्र, त्यात एका प्रमुख संशयिताला पळून जाण्यास वाव देणे, उर्वरित दोन संशयितांकडे कमी माल दाखविण्याचा प्रकार झाल्याची चर्चा लपून राहिलेली नाही. संशयितांकडे ‘एमडी’ व गांजाचा बऱ्यापैकी साठा होता असे बोलले जाते. अशा अनेक घटनांविषयी वरिष्ठांकडूनच सखोल पुर्नतपास होणे गरजेचे आहे, असे सर्वसामान्यातून बोलले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

SCROLL FOR NEXT