NSK26H31348
धुळे : सद्यस्थितीतील गुरु- शिष्य स्मारक ते बारा पत्थर रस्ता.
-----------
बारा पत्थर- गुरू शिष्य स्मारक रस्ता १८ मीटर रुंद होणार
धुळे महापालिकेकडून प्रक्रीया सुरु, हरकती- सुचनांसाठी ३० दिवसांची मुदत
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ४ : शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणाऱ्या ‘बारा पत्थर ते गुरू शिष्य स्मारक’ या रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या प्रस्तावाला महापालिकेकडून गती देण्यात आली आहे. महासभेच्या मंजूरीनंतर आता मनपा प्रशासने हरकती-सुचनांसाठी नोटीस काढली आहे. हरकती-सुचना प्राप्त होऊन, त्यावर सुनावणी घेवून तसा प्रस्ताव नंतर राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे सादर होईल.
धुळे शहरातील बारा-पत्थर ते गुरु- शिष्य स्मारक रस्त्यावर वाहतूक कोंडीसह अतिक्रमणाचा मोठा प्रश्न आहे. गेली अनेक वर्ष हा प्रश्न सातत्याने समोर येतो. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव महापालिकेकडून ३१ ऑगस्ट २०२६ च्या महासभेत मांडला व तो मंजूरही झाला. या वेळी काही विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी रस्ता रुंदीकरणाऐवजी इतर काही पर्यायांचा विचार व्हावा अशी सूचना मांडली होती. मात्र, त्याअनुषंगाने सत्ताधारी अथवा प्रशासनाकडून काही विचार झाल्याचे दिसत नाही. अर्थात, आता मनपा प्रशासनाने या प्रक्रीयेसाठी हरकती-सुचना मागविल्या आहेत.
पश्चिमेकडील जागा घेणार
बारा पत्थर ते गुरु- शिष्य स्मारक हा रस्ता सध्या १२-१३ मीटर रुंद असेल. तो १८ मीटर रुंद करण्याचा प्रस्ताव आहे. या रस्त्याची पश्चिम बाजूकडील रुंदी एकूण १८.०० मीटर करण्याबाबतचा हा फेरबदल प्रस्ताव आहे. यासंदर्भात आयुक्त नितीन कापडणीस यांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (१) नुसार नोटीस प्रसिद्ध केली आहे. या रस्त्याच्या पश्चिमेकडील बाजूने रुंदीकरणासाठी जागा ताब्यात घेण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे. या बाजूला बहुतांश महत्त्वाची शासकीय कार्यालये व संस्था आहेत. यामध्ये राजवाडे संशोधन मंडळ, तहसील कार्यालय आणि मनपा शाळा यांचा समावेश आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणात या शासकीय आस्थापनांची किती जागा जाते आणि खासगी मालकीची किती जागा संपादित केली जाते, याकडे लक्ष असेल. त्यावर काय हरकती दाखल होतात याकडेही लक्ष असेल.
३० दिवसांची मुदत
महापालिकेच्या स्थायी सभेत (ठराव क्र. ७०, दि. ३१/०८/२०२६) या रस्त्याच्या रुंदीकरणाचा विषय मंजूर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने फेरबदल प्रस्तावाबाबत नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास त्यांनी नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत आयुक्त, धुळे महानगरपालिका यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार करून पुढील प्रस्ताव शासनास सादर केला जाईल, तर मुदतीनंतर येणाऱ्या हरकतींची दखल घेतली जाणार नाही, असेही मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिकेने ही नोटीस १ ऑक्टोबरला प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता साधारण २५ दिवसांचा कालावधी हरकती- सूचना घेण्यासाठी बाकी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.