नाशिक

मुख्याध्यापक संघ निवेदन

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो-NSK26H31439 धुळे : शालेय पोषण आहाराच्या परवान्याच्या अनुषंगाने मुख्याध्यापकांवर कारवाई करु नये, या मागणीचे निवेदन उपशिक्षणाधिकारी श्रीमती ठाकूर यांना देतांना धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी. --- पोषण आहाराच्या परवान्यावरुन मुख्याध्यापकांवर कारवाई नको! --- धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघ; स्पष्ट मार्गदर्शक सूचनांची मागणी --- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ५ : प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत शालेय पोषण आहार शिजवणे व वितरीत करण्याच्या प्रक्रियेत मुख्याध्यापक किंवा शिक्षक हे व्यावसायिक अन्न व्यवसाय चालक अथवा पुरवठादार नाहीत. त्यामुळे अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) नोंदणी किंवा परवान्याबाबत सक्षम प्राधिकरणाकडून स्पष्ट कायदेशीर मार्गदर्शक सूचना प्राप्त होईपर्यंत मुख्याध्यापक, शिक्षक अथवा शाळा व्यवस्थापन समितीवर कोणतीही दंडात्मक किंवा प्रशासकीय कारवाई करू नये, अशी मागणी धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्याध्यापक संघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका केवळ शासनाकडून प्राप्त अन्नधान्यातून आहार शिजवून विद्यार्थ्यांना देण्यापुरती मर्यादित आहे. मुख्याध्यापक किंवा शिक्षक हे अन्नपदार्थांचे उत्पादक, विक्रेते किंवा खरेदीदार नाहीत. असे असतानाही विविध स्तरांवरून FSSAI नोंदणीसाठी मुख्याध्यापकांवर प्रशासकीय दबाव आणला जात असून, त्यामुळे शाळांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. अशा प्रकारची वैयक्तिक जबाबदारी मुख्याध्यापकांवर निश्चित केल्यास स्थानिक पातळीवर अनावश्यक राजकीय हस्तक्षेप वाढेल. त्यामुळे मुख्याध्यापकांची प्रशासकीय ऊर्जा शैक्षणिक कामांऐवजी यातच खर्च होऊन शैक्षणिक कामकाजावर प्रतिकूल परिणाम होईल असे मुख्याध्यापक संघाने म्हटले आहे. विभागांना निर्देश द्यावेत आहाराची स्वच्छता, सुरक्षितता व आरोग्याचे निकष पाळण्याबाबत मुख्याध्यापक संघ पूर्णतः सकारात्मक आहे. मात्र, FSSAI नोंदणीची मूळ जबाबदारी नेमकी कोणाची (पुरवठादार, कंत्राटदार की शासकीय यंत्रणा) हे शासनाने स्पष्ट करावे. मुख्याध्यापकांच्या नियंत्रणाबाहेरील बाबींसाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे अयोग्य असून, याप्रकरणी प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधित विभागांना योग्य ते निर्देश द्यावेत अशी मागणी धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने केली आहे. संघाचे अध्यक्ष संजय एल. पवार, सचिव यु. डी. तोरवणे व इतर पदाधिकाऱ्यांनी मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी बोडके व उपशिक्षणाधिकारी श्रीमती ठाकूर यांना दिले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT