धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त
--
वडणे शिवारातून
सोलरपंप चोरीस
धुळे : वडणे (ता. धुळे) शिवारातील शेतातून सोलर पंप चोरट्यांनी नेला. नऊ ऑक्टोबरला चोरट्यांनी सुनीता दिलीप पाटील यांच्या शेतातील वीस हजारांचा जे. के. कंपनीचा सोलरपंप नेला. या प्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
-
गळफास घेतल्याने
डॉक्टरचा मृत्यू
धुळे : विखरण (ता. शिंदखेडा) येथे रुपसिंग बंडूसिंग गिरासे (वय ५८) या डॉक्टरने आठ ऑक्टोबरला रात्री साडेअकराच्या सुमारास घरी गळफास घेतला. त्यांना दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित कले. याबाबत दोेंडाईचा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
-
गळफास घेतल्याने
विवाहितेचा मृत्यू
धुळे : घोडदे दिगर (ता. साक्री) येथे गळफास घेतल्याने २४ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला. अश्विनी ललित बहिरम असे मृत विवाहितेचे नाव आहे. घरातील सर्व सदस्य शेतात निंदणीकामी गेले असताना अश्विनी यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याबाबत पिंपळनेर पोलिस ठाण्यात प्रथमदर्शनी आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
-
विषारी औषधप्राशन;
एकाचा मृत्यू
धुळे : वलवाडी परिसरात विषारी औषध प्राशन केल्याने ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. सुभाषचंद्र विजयचंद्र मिश्रा (मूळ रा. नागपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिश्रा हे सोनगीर (ता. धुळे) परिसरातील एका खासगी कंपनीत कामाला होते. रात्रीच्या वेळी त्यांनी घरी विषारी औषध प्राशन केले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
-
गळफास घेतल्याने
एकाचा मृत्यू
धुळे : गळफास घेतल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना देवपूर परिसरात घडली. दशरथ टेमा आर्या (वय ३५, रा. बुलवानिया, जि. खरगोन, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे. सात ऑक्टोबरला सायंकाळी सहाच्या दरम्यान देवपूरात कल्याणी लॉन्सजवळील शिवाई कॉलनी परिसरात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दशरथ याचा मृतदेह आढळला. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
-
दुचाकींची धडक;
दोन जणांचा मृत्यू
धुळे : सुरत-नागपूर महामार्गावरील लोंढीनाल्याजवळ दोन दुचाकींची धडक होऊन जयसिंग चंदा गायकवाड (वय ४४) आणि छोटू खेका पावरा (वय ३२) यांचा मृत्यू झाला. हा अपघात आठ ऑक्टोबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास अकलाड-मोराणे (ता. धुळे) गावाजवळ घडला. जयसिंग गायकवाड आणि छोटू पावरा हे दुचाकीने (एमएच ३९ एके ८५४६) लोंढीनाल्यावरून जात असताना भिवा ठाकरे याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (एमएच १९ एएम १५७४) भरधाव आणि निष्काळजीपणे चालवून त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याचे याप्रकरणी दिनेश फाड्या पावरा (रा. चौदवाड बुद्रुक, ता. भडगाव, जि. नंदुरबार) यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यावरून भिवा ठाकरे याच्याविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
-
दुचाकीची धडक;
तरुणाचा मृत्यू
धुळे : पिंपळनेर ते पानखेडा (ता. साक्री) रस्त्यावर पानखेडा बसस्थानकाजवळ समोरून भरधाव दुचाकीने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला. शिवदास भारमल भारुडे (वय ३४, रा. काकशेवाड, ता. साक्री) असे मृत तरुणाचे नाव आहे. तीन ऑक्टोबरला रात्री साडेसातच्या सुमारास तो दुचाकीने (एमएच १८ एएस ९६०९) काकशेवाडकडे जात होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीने (एमएच ४१ बीक्यू ७६६१) भारुडे याच्या दुचाकीला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या भारुडे याचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित चालक घटनास्थळावरून पसार झाला. भारमल गुलाब भारुडे (रा. काकशेवाड) यांच्या फिर्यादीनुसार पिंपळनेर पोलिस ठाण्यात संशयित दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
-