नाशिक

धुळे टुडे १ संक्षीप्त

CD
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त -- जवानावर ब्लेडने वार; पाच जणांवर गुन्हा धुळे : कौटुंबिक वादातून भारतीय सैन्य दलातील जवान विकास आनंद इंदवे (वय २८, रा. मालपूर, ता. शिंदखेडा) यांच्यावर ब्लेडने वार करून त्यांच्यासह वडील आणि भावाला मारहाण करण्यात आली. हिरे भवन परिसरात बुधवारी (ता. २८) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. विकास इंदवे यांच्या फिर्यादीनुसार कैलास जगन्नाथ बैसाणे, कोमल कैलास बैसाणे, भूषण कैलास बैसाणे, नरेश जगन्नाथ बैसाणे आणि रेखा कैलास बैसाणे (सर्व रा. महाळपूर, ता. शिंदखेडा) यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. फिर्यादीनुसार संशयितांनी विकास इंदवे यांच्याशी वाद घालून शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी कोमल बैसाणे हिने स्वतःच्या डाव्या मनगटावर ब्लेड मारून घेतले. त्यानंतर कैलास बैसाणे याने तिच्या हातातील ब्लेड हिसकावून विकास इंदवे यांच्या पोटावर वार केला. भूषण आणि रेखा यांनी विकास यांच्या वडिलांना व भावाला मारहाण करून दमदाटी केली. - अश्लील शेरेबाजी; महिलेला मारहाण धुळे : धुळे तालुक्यातील एका गावात बुधवारी (ता. २८) सायंकाळी महिलेची छेड काढून तिला मारहाण केल्याची घटना घडली. फिर्यादीनुसार महेंद्र प्रेमचंद गुजर याने महिलेला उद्देशून अश्लील शेरेबाजी केली आणि तिचे केस ओढून विनयभंग केला. त्याच्या मुलानेही महिलेला शिवीगाळ व मारहाण करू ठार मारण्याची धमकी दिली. या झटापटीत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने पडून गहाळ झाले. याप्रकरणी महेंद्र प्रेमचंद गुजर आणि अक्षय महेंद्र गुजर (दोघे रा. मोहाडी प्र. डांगरी, ता. धुळे) यांच्याविरुद्ध सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - धातूचा नाग जप्त संशयित ताब्यात धुळे : शिंदखेडा येथील रेल्वेस्थानक परिसरात धातूचा नाग आढळल्याप्रकरणी दिनेश बाबुलाल परदेशी (वय ५५, रा. पाटण, ता. शिंदखेडा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन हजार ५०० रुपये किमतीचा धातूचा नाग जप्त केला. पोलिस शिपाई कोळी यांच्या फिर्यादीनुसार शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - ठारधाडणे फाट्यावर पुरुषाचा मृत्यू धुळे : धाडणे (ता. साक्री) फाट्याजवळ गुरुवारी (ता. २८) सकाळी आठच्या सुमारास वाहनाच्या धडकेत अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. पोलिसपाटील चेतनानंद अहिराव यांच्या फिर्यादीनुसार संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. - स्कूटी अपघातात पत्नीचा मृत्यू धुळे : रोहन (ता. साक्री) फाट्याजवळ गुरुवारी (ता. २८) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास स्कूटीच्या अपघातात रूपाली पंकज भदाणे (वय ३७, रा. जेबापूर, ता. साक्री) यांचा मृत्यू झाला. पती पंकज प्रकाश भदाणे हे स्कूटी (एमएच १८ सीएम ६९८३) भरधाव वेगाने चालवत असताना झालेल्या अपघातात मागे बसलेल्या रूपाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी पंकज भदाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. - दुभाजकाला धडक; तरुणाचा मृत्यू धुळे : भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवून दुभाजकाला धडक दिल्याने मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी चालक गौरव देवेंद्र मगर (वय २२, रा. साकूर, ता. मालेगाव, जि. नाशिक, सध्या रा. विंचूर, ता. धुळे) याच्याविरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले प्रमोद शशिकांत शिंदे (वय २५, रा. विंचूर, ता. धुळे) गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RO-KO ची न्यूझीलंडमध्ये जोरदार तयारी! BCCI ने विराट-रोहितचा शेअर केला खास Video; कधी सुरू होणार वनडे मालिका?

Amit Shah: संसदेत होणार 'आर-पार'ची लढाई! 'मत चोरी'च्या मुद्द्यावरुन अमित शाहांचं राहुल गांधींसह अखिलेश यादवांना आव्हान

Marathi News Live Updates : समृद्धी महामार्गावर हेक्टरी एक लाख रुपये भरपाईसाठी आंदोलन करणारे आमदार नितीन देशमुखांना पोलिसांनी घेतले ताब्यात!

Narayangaon Crime : राज्य उत्पादन शुल्क विभागाची जुन्नर व पारनेर तालुक्यात धडाकेबाज कारवाई; लाखो रुपये किमतीचा बनावट विदेशी मद्य साठा जप्त, तीन आरोपींना अटक

Shirur Crime : शिरूर पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारात दोन गटांत झोंबाझोबीसह लाथाबुक्क्यांची फ्रि स्टाईल; महिलांचाही सहभाग

SCROLL FOR NEXT