नाशिक

क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण

CD
धुळे टुडे २ साठी अँकर... फोटो- NSK26H33586 धुळे : अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमातर्फे आयोजित क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देवून गौरवितांना पद्मश्री चैत्राम पवार व इतर मान्यवर. --- गावपातळीवरील क्रीडा केंद्रांतून खेळाडू घडवावेत --- पद्मश्री चैत्राम पवार; वनवासी कल्याण आश्रमातर्फे क्रीडा स्पर्धा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २६ : स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंनी आपापल्या गावात क्रीडा केंद्रे सुरू करावी आणि या क्रीडा केंद्रांच्या माध्यमातून चांगले खेळाडू घडवावेत, असे आवाहन देवगिरी कल्याण आश्रमाचे प्रांताध्यक्ष पद्मश्री चैत्राम पवार यांनी केले. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या देवगिरी प्रांताच्या वतीने धुळ्यात प्रांतस्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच झाल्या. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभात श्री.पवार बोलत होते. आश्रमाचे प्रांत पदाधिकारी जयराम चौधरी, प्रेमसिंग पाडवी, मधुकर वाणी, विजय पवार, श्री. पराडके, जिल्हाध्यक्षा विद्या बागुल, महेंद्र विसपुते, इनेश गावित उपस्थित होते. या क्रीडा स्पर्धांमध्ये २१ आणि ४२ किलोमीटर धावण्याच्या मॅरेथॉन शर्यतीबरोबरच गोळाफेक, लांब उडी, १००, ४००, ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धा धुळे जिल्हा क्रीडा संकुलात २५ ऑक्टोबरला झाल्या. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील जिल्हास्तरीय विजेत्या ११० मुला- मुलींनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील विजेते भुवनेश्वर येथे होणाऱ्या अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धांसाठी पात्र ठरले आहेत. स्पर्धांचा निकाल असा मॅरेथॉन (४२ किलोमीटर) : प्रथम- गोविंदा पावरा (धुळे), द्वितीय- पिंट्या वसावे (नंदूरबार), तृतीय- आवसिंग वळवी (नंदूरबार). मॅरेथॉन (२१ किलोमीटर) : प्रथम- खुमानसिंग ठाकरे (नंदूरबार), द्वितीय- करा पटवे (नंदूरबार), तृतीय- करन पावरा (धुळे). १६ वर्षाखालील मुलींच्या ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत जळगावच्या स्पर्धकांनी बाजी मारली तर ४०० आणि १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत नंदूरबारच्या स्पर्धकांचे वर्चस्व राहिले. १९ वर्षाखालील मुलींची ४०० मीटर रिले स्पर्धा नंदूरबार आणि धुळे संघांनी गाजवली. १९ वर्षाखालील मुलांच्या ४०० मीटर रिले स्पर्धेत धुळे संघाने बाजी मारली. तसेच गोळाफेक आणि लांब उडी स्पर्धांमध्ये नंदूरबारच्या स्पर्धकांचे वर्चस्व राहिले. यांचे परिश्रम या स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी हेमंत भदाणे व त्यांचे सहकारी तसेच प्रा. भिकन बारसे, किरण पालवे, अनिल वाणी, सौ. वाळके, मुकेश चौधरी, उमेश चौधरी यांचे सहकार्य लाभले. देवगिरी कल्याण आश्रमाचे प्रांत पदाधिकारी डॉ. मंदार म्हसकर, महेंद्र विसपुते, भाऊसाहेब काळे, इनेश गावित, जयराम चौधरी, विठ्ठलराव ओढेकर, किशोर जोशी, आशुतोष पूरकर, यशवंत वळवी, वीरसिंग वसावे, नरसिंग बारेला यांनी परिश्रम घेतले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flex-Fuel: पेट्रोलशिवायही धावणार तुमची कार! केंद्र सरकारची E100 इंधनाला मंजुरी

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे अपडेट्स! केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांसाठी काय महत्त्वाचं?

Thane News: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! श्रमजीवीच्या मोर्चामुळे वाहतुकीत बदल, अनेक रस्ते बंद; काय असतील पर्यायी मार्ग?

Breast Cancer: पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका; 'या' बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra Live News: शिरूर नगर परिषदेत भाजपच्या ११ नगरसेवकांचा सत्तापक्षाला पाठिंबा

SCROLL FOR NEXT