नाशिक

शिक्षकांना नियुक्ती आदेश

CD
धुळे : मुख्य अंकातील पानासाठी... -- फोटो क्रमांक : धुळे जिल्हा परिषद लोगो वापरणे. -- धुळे जिल्हा परिषदेत ६७ शिक्षकांना नियुक्ती आदेश -- पवित्र पोर्टलद्वारे समुपदेशनाने पार पडली प्रक्रिया सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ६ : जिल्हा परिषदेच्या वतीने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक पदाच्या पहिल्या टप्प्यातील पात्र उमेदवारांना समुपदेशनाद्वारे प्रत्यक्ष शाळेवर पदस्थापना देत नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील शाळांवरील शिक्षक भरतीचा मार्ग सुकर झाला आहे. जिल्हा परिषदेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण सेवक पदासाठी प्राप्त झालेल्या यादीतील ६८ उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी सोमवारी (ता. ६) करण्यात आली. या तपासणीअंती ६८ पैकी ६७ उमेदवार पात्र ठरले. जिल्हा परिषद कार्यालयात पार पडलेल्या विशेष समुपदेशन सत्रात या सर्व ६७ पात्र उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या शाळेवर पदस्थापना देण्यात आली. कागदपत्र तपासणी आणि समुपदेशनानंतर लगेचच उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्ती आदेशही सुपूर्द करण्यात आले. जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या मार्गदर्शनात ही संपूर्ण भरती प्रक्रिया पार पडली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत साबळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैभव बाचकर, उपशिक्षणाधिकारी प्रमोद सोनार तसेच चारही तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. तसेच प्रशासकीय कामकाजात सहाय्यक प्रशासन अधिकारी ज्योती पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी बबिता पटले, लक्ष्मीकांत वाघ, प्रवीण चौधरी, भानुदास पाटील, रवींद्र बोरसे, तुषार दिक्षीत आणि संदीप सोनवणे यांनी सहकार्य केले. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

Kalamb Crime : पवनचक्की तार चोरीचा पर्दाफाश; पाच जणांना अटक, ११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Marathi News Live Updates: बारामतीत राष्ट्रवादीकडून 'सोमेश्वर'चा जाहीरनामा प्रसिध्द

Mumbai: तीन दिवसांपासून दार बंद, घर उघडतात ४० वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला; मालवणीतील संशयास्पद मृत्यूने खळबळ

SCROLL FOR NEXT