नाशिक

गोदामाला भीषण आग

CD
धुळे ः टुडे ३ साठी किंवा खानदेश पानासाठी -- फोटो क्रमांक ः 33828 धुळे : टायर गोदामाला लागलेली आग. -- टायर गोदामाला भीषण आग - तीन जण जखमी : चाळीसगाव चौफुलीलगत घटना सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २८ : येथील चाळीसगाव चौफुली परिसराजवळ हॉटेल कुणालच्या बाजूला असलेल्या एका टायर गोदाम आणि बॅटरी दुकानाला बुधवारी (ता. २८) सकाळी साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असून, गोदामातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चाळीसगाव चौफुलीलगत अब्दुल चौधरी यांच्या मालकीचे महाराष्ट्र बॅटरी हे दुकान आणि दुकान संलग्न टायरचे गोदाम आहे. या गोदामातून सकाळी धूर निघू लागला. गोदामात मोठ्या प्रमाणावर टायर आणि बॅटऱ्यांचा साठा असल्यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. धुराचे लोट दूरवर दिसत असल्याने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. - अग्निशमन दल दाखल घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाचे अधिकारी दुष्यंत महाजन यांच्या मार्गदर्शनात जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करत अथक परिश्रमांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आग पूर्णपणे विझवण्यासाठी अग्निशमन वाहनांच्या तब्बल आठ फेऱ्या झाल्या. या मोहिमेत लीडिंग फायरमन राजन महाले, अमोल सोनवणे, सचिन करनकाळ, किरण साळवी, कुणाल ठाकूर, तसेच वाहनचालक निलेश सोनवणे, प्रशांत मुर्तडक, नरेंद्र बागूल, धनंजय खैरनार आणि विनोद थोरात यांनी सहभाग घेतला. या आगीच्या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : पदवीधरांचा कौल सरकारविरोधात; धोरणांबद्दल तरुणांची नाराजी, दुष्काळी मदतीची पाच हजारांची रक्कम अपुरी

मोठी बातमी! INDIA आघाडीच्या महारॅलीला अभिजीत दीपके यांचा पाठिंबा; ‘GYANU MUST GO’ म्हणत पोस्ट, नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: ''महाराष्ट्रात आणखी २३ प्रकल्प येत आहेत.. भीमाशंकर परिसरातील वृक्षतोड टेंडरशिवाय'', राज ठाकरेंची कर्जतमध्ये सभा

MLA Harshada Deshmukh : एमपीएससीतील पारदर्शकतेसाठी प्रयत्न करणार; रोजगार, शिक्षणाच्या प्रश्नांवरही देणार भर

Raj Thackeray Karjat tree cutting visit : "गुजरातमधल्या एका कंपनीसाठी हा सारा खटाटोप!"; कर्जतच्या जंगलात स्वतः उतरताच राज ठाकरेंचा सरकारवर थेट वार, सभेत तोफ धडाडणार!

SCROLL FOR NEXT