नाशिक

तंबाखूजन्य पदार्थ विक्री कारवाई

CD
धुळे टुडे २ साठी मेन... --- फोटो-NSK26H32331 धुळे : शैक्षणिक संस्थेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्याकडून दंड वसुल करतांना महापालकेचे पथक. --- तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर ‘मनपा’ची कारवाई --- सेवा संकल्प अभियानांतर्गत धुळ्यात विशेष मोहीम; २५ हजार रुपये दंड वसूल सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १४ : सेवा संकल्प अभियानांतर्गत नशामुक्तीच्या उद्देशाने धुळे महापालिकेमार्फत शहरातील शैक्षणिक संस्थांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या विशेष मोहिमेत महापालिकेच्या पथकाने विक्रेत्यांकडून आत्तापर्यंत सुमारे २५ हजार रुपये दंड वसूल केला. धुळे महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या निर्देशानुसार शहरातील शाळा व शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार बुधवारी (ता.१४) बाफना शाळेसमोरील परिसर, जे. आर. सिटी हायस्कूल परिसर तसेच कमलाबाई शाळा परिसरातील पानटपरी व तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे २५ हजार रुपये दंड संबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांकडून वसुल करण्यात आला. या कारवाईवेळी मुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील, कार्यालयीन अधीक्षक साईनाथ वाघ, सर्व स्वच्छता निरीक्षक व मुकादम उपस्थित होते. धुळे महापालिकेतर्फे शहरातील शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधातील ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे महापालिकेच्यावतीन सांगण्यात आले. सर्व प्रभागांमध्ये कारवाई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त डॉ. सोनाली देवरे- पगार यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष मोहिम राबविण्यात आली. दरम्यान, अशा प्रकारच्या कारवाईसाठी शहरातील सर्व १९ प्रभागांमध्ये संबंधित प्रभागातील स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभागातील शैक्षणिक संस्थांच्या निर्धारित परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. --- ...कोट... शैक्षणिक संस्थेच्या शंभर मीटर परिसरात कोणीही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये. असा प्रकार आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवणे, शैक्षणिक परिसर नशामुक्त करणे आणि नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. -डॉ. सोनाली देवरे, सहायक आयुक्त, मनपा धुळे ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात महत्त्वाची बैठक

Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

'या गोजिरवाण्या घरात' मधली दीक्षा आठवते? सध्या काय करते? सांगितलं छोट्या पडद्यावर न दिसण्याचं कारण

SCROLL FOR NEXT