नाशिक

वाहतूक स्थितीची पाहणी

CD
धुळे ः टुडे १ साठी -- फोटो नाही घेतला तरी चालेल...जागेच्या गरजेनुसार घ्यावा... फोटो क्रमांक ः 31747 धुळे : अधिकाऱ्यांशी संवाद साधताना विशाल आनंद. -- धुळ्यातील वाहतुकीची स्थिती; उपायांसाठी ‘एसपी’ सरसावले - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ८ : शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरामध्ये सुट्टीच्या व भरण्याच्या वेळी होणारी विस्कळीत वाहतूक आणि त्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना होणारा त्रास गंभीरतेने घेत, पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी गुरुवारी (ता. ८) शहरात प्रत्यक्ष पाहणी केली. वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी तातडीने विशेष नियोजन करण्याचे कडक निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शहरातील कमलाबाई कन्या शाळा, न्यू सिटी हायस्कूल, जयहिंद हायस्कूल, एल. एम. सरदार, महाजन हायस्कूल, सेंट अँथोनी, कनोसा कॉन्व्हेंट या प्रमुख शिक्षण संस्थांच्या परिसरासह संवेदनशील समजल्या जाणाऱ्या संतोषीमाता चौकाची पोलिस अधीक्षकांनी पाहणी केली. या दरम्यान काही चौकांमध्ये झालेली अतिक्रमणे आणि त्यामुळे होणारे रस्ते अरुंद झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी गर्दीची ठिकाणे, वाहतुकीतील अडथळे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा सविस्तर आढावा घेतला. अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत महाले उपस्थित होते. - बीट मार्शल पथक शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेत वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी बीट मार्शल पथकाने अधिक प्रभावी व नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. तसेच, वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या शिस्तप्रिय नसलेल्या वाहनचालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी सक्त सूचना पोलिस अधीक्षकांनी दिली. या समस्येवर शाश्वत उपाय शोधण्यासाठी लवकरच महापालिका व वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावली जाणार असून, याद्वारे शहराच्या वाहतूक व्यवस्थेचे पुढील अंतिम नियोजन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : हवामानात अचानक मोठा उलटफेर! ३० हून अधिक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा सविस्तर

Yashasvi Jaiswal आता होणार विकेटकिपर? नवा प्लॅन चर्चेत; कर्णधारानेही केलाय खुलासा

Latest Marathi News Live Update: कचनेर तांड्यात गांजाची शेती उघडकीस; २४१ झाडे जप्त

MPSC Student Agitation : पुण्यात एस. एम. जोशी पुलावरील एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा नकार; जागा तातडीने रिकामी करण्याचे आदेश

नाना पाटेकरांच्या आठवणीत Eknath Shinde भावूक, काय म्हणाले ?

SCROLL FOR NEXT