नाशिक

धुळे पथदिवे मागणी निवेदन

CD
धुळे : टुडे पान २ साठी... -- फोटो क्रमांक : 34116 धुळे : सुरक्षेसाठी अंडरपाससह पथदिवे बसवले जावेत या मागणीचे निवेदन पालकमंत्री जयकुमार रावल यांना देताना माजी नगरसेवक मुजफ्फर हुसेन दोस्त महमद. -- सुरक्षेसाठी अंडरपाससह पथदिवे बसवले जावेत -- मुजफ्फर हुसेन यांची निवेदनातून मागणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३१ : मुंबई- आग्रा महामार्गावरील राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण तीनवरील उम्मेसलमा मर्जीद किंवा सुलतानिया मदरसा आणि साहिल हॉटेल जवळील परिसरात सुरक्षेसाठी अंडरपाससह पथदिवे बसवले जावेत, अशी मागणी शहर कॉँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक मुजफ्फर हुसेन दोस्त महमद यांनी केली. मुजफ्फर हुसेन यांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देत या मागणी केली. जनहिताचासह सुरक्षेचा हा महत्त्वाचा विषय असल्याने, या पत्राची दखल घेऊन कामांना त्वरित मंजुरी देण्याची शिफारस पालकमंत्र्यांनी करावी, अशी विनंती निवेदनात केली आहे. - शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, लहान मुले तसेच वाहनधारकांची मोठी ये- जा असते. या ठिकाणी वाहनांचा वेग जास्त असल्याने व रस्ता ओलांडण्यासाठी कोणतीही सुरक्षित व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उम्मेसलमा मर्जीद किंवा सुलतानिया मदरसा व साहिल हॉटेलजवळ पादचारी व वाहनांसाठी अंडरपास मंजूर करून त्याचे काम तातडीने सुरू करावे. तसेच, रात्रीच्या वेळी होणारे अपघात टाळण्यासाठी व सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात हायमॅस्ट किंवा योग्य क्षमतेचे पथदिवे बसविण्याची मागणी मुजफ्फर हुसेन यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus: दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! लालपरीच्या जादा फेऱ्या, मुंबई विभागाचा मोठा निर्णय

Mumbai News: समुद्रात उभे राहणार नौकांचे शहर! मुंबईच्या पर्यटनाला नवी ओळख मिळणार; कसा असेल ९२२ कोटींचा प्रकल्प?

Marathi News Live Updates : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजा; राज्यपाल व मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती

Beed Crime : घरफोडी, चोऱ्या करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा बीड एलसीबीने केला पर्दाफाश; ​४ गुन्हे उघडकीस; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

दिल्लीत इंडिया आघाडीची 'मॉक संसद'! मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात प्रतिकात्मक महाभियोग; ज्ञानेश कुमारांची खुर्ची धोक्यात?

SCROLL FOR NEXT