नाशिक

जलयुक्त शिवार अभियान

CD
धुळे : टुडे १ साठी..सेकंडमेन -- फोटो क्रमांक : 32472 धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंधारण योजनांच्या आढावा बैठकीत बोलताना भाग्यश्री विसपुते. शेजारी बाबासाहेब बेलदार, शरद पवार, बालाजी क्षीरसागर व अन्य अधिकारी. -- हजारावर कामे २२ कोटींतून पूर्ण -- जिल्हाधिकारी विसपुते : जलयुक्त शिवार अभियान २.० सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ : दुष्काळावर मात करण्यासाठी केवळ पाणी उपलब्ध करणे पुरेसे नसून, पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवून भूजल पातळी वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना गती देऊन ती वेळेत व गुणवत्तेसह पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी यंत्रणेला दिले. जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत जिल्ह्यात ७० गावांची निवड, तसेच सुधारित आराखड्यानुसार सुमारे २२ कोटी ३३ लाखांच्या खर्चातून एक हजार ३१३ कामांचे नियोजन असून, पैकी एक हजार ३०३ कामे पूर्ण झाल्याची माहिती आढावा बैठकीत देण्यात आली. - जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात सिंचनासंबंधी योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी विसपुते अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा परिषदेचे सीईओ बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन शिंदे, उपअभियंता जितेंद्र पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. - योजनेचा आढावा बैठकीत योजनांचा आढावा घेण्यात आला. तो असा- जलयुक्त शिवार अभियान २.० : गावांची निवड (७०)- धुळे (१७), शिरपूर (१७), साक्री (१७), शिंदखेडा (१९). कामांची स्थिती : १,३१३ नियोजित कामांपैकी १,३०३ कामे पूर्ण, तर १० कामे प्रगतिपथावर. झालेला खर्च- सुमारे २२.३३ कोटी. पुढील दिशा- पूर्ण कामांचे त्रयस्थ मूल्यमापन (थर्ड पार्टी ऑडिट), जिओटॅगिंग आणि गावांचे जलपरिपूर्णता अहवाल तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्देश. गाळमुक्त धरण : गाळयुक्त शिवार (२०२६- २०२७) प्रशासकीय मान्यता : ५७ कामे, सद्यःस्थिती- १३ कामे पूर्ण, १ काम सुरू, गाळ काढण्याचे प्रमाण:- ४,०४,०७० घनमीटर नियोजनापैकी १,३०,२७२ घनमीटर गाळ काढला. निधी तरतूद- २.३५ कोटी. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पाणलोट विकास ३.०) : व्याप्ती- ४ तालुक्यांतील १६२ गावे (७ समूह) आणि १,४२,७८१ हेक्टर क्षेत्र, तालुकानिहाय गावे- धुळे (६५), साक्री (५०), शिरपूर (३१) आणि शिंदखेडा (१६), प्रमुख भर- मृदसंधारण, नाला उपचार, शेततळी, बंधारे व भूजल पुनर्भरण. - समन्वयाची गरज कामांचा केवळ संख्यात्मक आढावा न घेता त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, यावर भर देत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित विभागांना परस्पर समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. तलावांतील गाळ काढण्यासोबत नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यास अतिवृष्टीच्या काळात होणारे नुकसान टाळता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जलसंधारणाच्या कामांचा दर्जा आणि परिणामकारकता थेट गावकऱ्यांच्या जीवनमानावर दिसली पाहिजे. भविष्यातील पिढ्यांसाठी जलसमृद्धीचा भक्कम पाया रचणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असेही जिल्हाधिकारी विसपुते यांनी नमूद केले. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

Latest Marathi News Update: कॅफेबाहेर खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला अटक

Hingoli District Earthquake : हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर २.९ तीव्रतेची नोंद

IND vs WI : अर्शदीप सिंग पाचव्या T20I मधून बाहेर गेला, तर त्याची जागा कोण घेणार; ३६ वर्षीय गोलंदाजाच्या कमबॅकची तुफान चर्चा

SCROLL FOR NEXT