फोटो चार किंवा पाच कॉलमात घेतला...तर चेहरे नीट दिसू शकतील...संबंधित आपले कात्रण जपून ठेऊ शकतील...
---
फोटो क्रमांक ः 34921
धुळे ः गुरुद्वारा परिसरातील एसव्हीकेएम शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर राजमाता पद्माराजे कदमबांडे महिला जिल्हा अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेच्या उद्घानावेळी उपस्थित मान्यवरांसह महिला क्रिकेटपटू.
---
महिला जिल्हा अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा सुरू
----
राजमाता पद्माराजे कदमबांडे स्मृतीनिमित्त धुळ्यात होणार चुरशीचे सामने
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १२ ः महिलांमध्ये क्रिकेट खेळाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे राजमाता पद्माराजे रघुजीराव कदमबांडे महिला जिल्हा अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे २०२६ उद्घाटन एसव्हीकेएम शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर गुरुवारी (ता. १२) झाले. साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.
जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, सल्लागार तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, संघटनेचे पदाधिकारी प्रकाश पाटील, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, मनपा स्थायी समिती सभापती लताबाई पोतदार, बालकल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे, माजी महापौर कल्पना महाले, प्रतिभा चौधरी, भाजपच्या बेटी बचाव अभियानाच्या प्रदेश संयोजिका अल्पा अग्रवाल, बास्केटबॉल प्रशिक्षक मुद्रा अग्रवाल, योगेश्वरी मिस्तरी, संतोषी पिंपळसे, महादेव परदेशी, प्रफुल्ल पाटील, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. सुशील महाजन, सदस्य माधुरी पाटील, कुंतल अग्रवाल, पूजा जैन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मैदानावर लेखक संजय जगताप लिखित ‘महाराजकुमारी श्रीमंत पद्माराजे छत्रपती- कदमबांडे’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
----
चार संघ, सात सामने
आमदार मंजुळा गावित यांनी अशा स्पर्धांमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिला खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळते, असे सांगितले. महिलांना प्रोत्साहन देत मुलींनी मुलांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात पराक्रम गाजवावा, असे आवाहन महापौर परदेशी यांनी केले. स्पर्धेत ६० महिला खेळाडूंचा सहभाग असून, त्यांचे चार संघ (डीडीसीए रणरागिणी, डीडीसीए शिवकन्या, डीडीसीए शक्तिरूपा आणि डीडीसीए वीरांगणा) तयार करण्यात आले आहेत. स्पर्धेत एकूण सात रंगतदार सामने खेळविले जाणार आहेत.
---
पारितोषिंकाचा वर्षाव
एसव्हीकेएम शैक्षणिक संस्थेचे सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या पुढाकाराने स्पर्धेत सहभागी खेळाडूंसाठी नाश्ता, भोजन आणि निवासाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. विजेत्या संघांसाठी रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली असून, असोसिएशनचे सल्लागार तथा माजी आमदार कदमबांडे यांच्यातर्फे प्रथम क्रमांकासाठी ११ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. शिवाय मालिकावीराला अकराशे रुपये व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टीरक्षक, अंतिम सामनावीर, तसेच प्रत्येक सामन्यातील सामनावीर, अशा वैयक्तिक पुरस्कारांसाठी प्रत्येकी पाचशे रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच दिग्विजय पाटील व अजिंक्य पाटील यांच्यातर्फे १४ वर्षांखालील खेळाडूंना क्रिकेट ड्रेसचे वाटप करण्यात आले. प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. संजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सतीश मराठे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.