नाशिक

चंचल पालकांच्या कुशीत

CD
धुळे ः टुडे ३ साठी, ॲंकर -- फोटो क्रमांक ः 34150 धुळे : देवपूर पोलिस ठाण्यातील बालस्नेही कक्षात सुरक्षित पोहोचलेल्या चंचल जाधव या चिमुकलीस तिच्या पालकांच्या स्वाधीन करताना सहायक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह मोहिते, अंमलदार आणि अंगणवाडी सेविका. -- हरविलेली चिमुकली चंचल पालकांच्या कुशीत - डायल ११२ ची तत्परता; देवपूर पोलिसांचा बालस्नेही कक्ष ठरला मदतीचा हात सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३१ : आई- वडिलांपासून दुरावल्याने रडणाऱ्या चार वर्षांच्या चिमुकलीला देवपूर पोलिसांनी अवघ्या काही वेळात शोधून तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. ‘डायल ११२’ च्या मदतीने मिळालेला कॉल, पोलिसांची तत्परता आणि समाजमाध्यमांचा प्रभावी वापर यामुळे हा सुखद अनुभव पाहायला मिळाला. चंचल गणेश जाधव असे या चिमुकलीचे नाव आहे. - देवपूर पोलिस ठाण्याला ‘डायल ११२’ या मदत क्रमांकावर एक कॉल आला. देवपूरमधील १२ फुटी हनुमान मंदिर, बिलाडी फाटा परिसरात चार वर्षांची एक मुलगी आई- वडिलांपासून हरविली असून, ती रडत असल्याची माहिती या कॉलद्वारे देण्यात आली. माहिती मिळताच महिला पोलिस कर्मचारी मोनाली पगारे आणि वाहनचालक होमगार्ड गेणप्पा घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी बालिकेला विश्वासात घेऊन सुरक्षितपणे देवपूर पोलिस ठाण्यात आणले. - प्रेमाने विचारपूस पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह मोहिते यांनी बालिकेची प्रेमाने विचारपूस केली. तिने आपले नाव चंचल गणेश जाधव असल्याचे सांगत आपण अंगणवाडीत शिकत असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक मोहिते यांनी पोलिस पथकाला पालकांच्या शोधासाठी रवाना केले. तसेच समाजमाध्यमांवर बालिकेची माहिती आणि छायाचित्र प्रसारित केले. जिल्हा अंगणवाडी शिक्षक समूहातही हा संदेश वेगाने व्हायरल झाला. या समूहाच्या मदतीने अल्पावधीतच चिमुकलीच्या पालकांचा शोध लागून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत चिमुकली चंचल हिला तिच्या पालकांच्या सुखरूप स्वाधीन करण्यात आले. ‘डायल ११२’ ची तत्परता, पोलिसांची संवेदनशीलता आणि समाजमाध्यमांची ताकद यामुळे एका लेकीला अवघ्या काही तासांत तिचे आई- वडील परत मिळाले. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 5th T20I: शेवटचा सामन्यात होणार मोठे प्रयोग? वैभव सूर्यवंशी, कुलदीपला मिळणार Playing XI मध्ये संधी?

Marathi News Live Updates : गोकुळ दूध संघातर्फे उत्पादकांना ११७ कोटींची 'दिवाळी भेट'; अंतिम दूध दर फरक थेट बँक खात्यात जमा

Omer Abdullah: जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?

Foreign Deputy PM daughter Bollywood Ambition : "ते नेते माझ्या मागेच लागलेत!"; जगातील 'त्या' बलाढ्य देशाच्या उपपंतप्रधानांच्या मुलीला काम करायचंय बॉलिवूडमध्ये; केंद्रीय मंत्र्यांचा मोठा खुलासा

Mumbai News: पुनर्रोपणासाठी मुंबईत जागा आहे कुठे? पर्यावरणप्रेमींचा सवाल; पाच महिन्यांत ७,६३३ झाडे हटवण्यास परवानगी

SCROLL FOR NEXT