Senior citizen esakal
नाशिक

व्‍यथा ज्‍येष्ठांच्‍या : पेन्‍शन र‍कमेतून औषध खरेदीही मुश्‍कील

ज्‍येष्ठ नागरिकांना अगदी एक हजार रुपये इतकी तोकडी पेन्‍शन मिळत असून, त्‍यात गुजराण करायची कशी, हा त्यांच्यापुढील यक्षप्रश्‍न आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : त्‍यांनी तब्‍बल ३६ वर्षे खासगी कंपनीत नोकरी केली. कंपनीच्‍या विकासात व पर्यायाने देशाच्‍या विकासात योगदान देताना त्‍यांनी सर्वतोपरी कष्ट उपसले; परंतु निवृत्त झाल्‍यानंतर ईपीएफच्‍या रूपाने त्‍यांना पेन्‍शन मिळतेय फक्‍त एक हजार ८४० रुपये. आता या र‍कमेत औषधे घ्यायची की भाकरी-मिठाची व्‍यवस्‍था करायची, असा प्रश्‍न ज्‍येष्ठ नागरिक प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला. हे त्‍यांचे एक उदाहरण झाले, परंतु खासगी कंपनीतून निवृत्त झालेल्‍या अशा हजारो ज्‍येष्ठ नागरिकांना अगदी एक हजार रुपये इतकी तोकडी पेन्‍शन मिळत असून, त्‍यात गुजराण करायची कशी, हा त्यांच्यापुढील यक्षप्रश्‍न आहे.

श्री. महाजन व्‍हीआयपी कंपनीतून निवृत्त झाले. ते ३६ वर्षे सेवा बजावताना, २०१० मध्ये निवृत्त झाले. निवृत्त झाल्‍यावर लगेच पेन्‍शन सुरू होणे ही अशक्‍यप्राय गोष्ट. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करताना त्‍यांना अखेर पेन्‍शन सुरू झाली. सध्या त्‍यांना मोजून एक हजार ८४० रुपये पेन्‍शन मिळत असून, इतक्‍या र‍कमेत औषधांचा खर्च भागवायचा की कुटुंबातील अन्‍य खर्च भागवायचे, असा प्रश्‍न त्‍यांना सतावतो आहे. आता या वयात पेन्‍शनची रक्‍कम वाढविण्यासाठी लढा द्यावा लागत असल्‍याची खंत ते व्‍यक्‍त करतात. कर्तव्‍यावर असताना आपण कंपनी व पर्यायाने अर्थव्‍यवस्‍थेकरिता योगदान दिले. त्‍यामुळे सन्‍मानपूर्वक व दैनंदिन गरजा भागतील इतकी तरी पेन्‍शनची रक्‍कम असावी, अशी माफक अपेक्षा ते व्‍यक्‍त करतात.


हजारो ज्‍येष्ठांची हीच व्‍यथा

खासगी कंपनीतून निवृत्त झालेल्‍या हजारो ज्‍येष्ठ नागरिकांची एकच व्‍यथा आहे. काहींना तर एक हजार रुपये इतकी तोकडी पेन्‍शन मिळते आहे व ज्‍येष्ठ नागरिक दांपत्‍यांचा खर्च सरासरी तीन ते चार हजार रुपये असताना, ही तफावत भरून कशी काढायची या विचाराने अनेक ज्‍येष्ठ नागरिक हवालदिल झालेले आहेत.

ज्‍येष्ठांना उद्‍भवणाऱ्या प्रमुख अडचणी...

*निवृत्त झाल्‍यावर पेन्‍शनसाठी सहा महिने ते वर्षभरापर्यंत करावी लागते प्रतीक्षा.
*प्रक्रिया पूर्ण करताना अधिकाऱ्यांकडून अडवणुकीने होतो मनस्‍ताप.
*कागदपत्रांची पूर्तता करताना होते दमछाक.
*किमान सहा हजार पेन्‍शन व डीए मिळण्याची अपेक्षा.
*दावा दाखल नसलेल्‍या र‍कमेचा योग्‍य विनियोग होण्याची अपेक्षा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino Maharashtra Rain : डीप डिप्रेशन वादळी स्थिती; अल् निनोला भेदून महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज आला समोर

Student Protest: विद्यार्थी, शेतकरी आंदोलनाची तयारी; ‘सीजेपी’ आणि संयुक्त किसान मोर्चा सरकारविरुद्ध आक्रमक

ब्रेकिंग! मोहोळ तालुक्यातील चिंचोळी ‘एमआयडीसी’त बनावट दारूची फॅक्टरी; कारवाई संपायला लागले १२ तास; ‘एक्साईज’च्या अधीक्षक म्हणाल्या, १५ वर्षांतील सर्वांत मोठी कारवाई

Commonwealth Games 2026: नाशिकच्या दिलीप गावितला 'सुवर्ण'; Goosebumps आणणारा Video! २ रौप्यपदकांसह भारताने सहाव्या दिवशी पक्की केली ६ पदकं

WHO IS DILIP GAVIT? ५ वर्षांचा असताना झाडावरून पडला अन् हात गमावला... शेतमजूराच्या पोरानं राष्ट्रकुल स्पर्धेत 'सुवर्ण'अध्याय लिहिला; संघर्षमय कहाणी

SCROLL FOR NEXT