Officials and students of Akhil Bharatiya Vidyarthi Parishad giving a statement to Savitribai Phule Pune University sub center administration regarding the problems of students. esakal
नाशिक

Nashik: वर्ष वाया गेलेल्यांना प्रवेशासाठी अडचण! पुणे विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात ABVPचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पासिंग क्रेडिट क्रायटेरियामध्ये वर्ष वाया गेलेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात तात्पुरता प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, विद्यापीठाच्या परिपत्रकात ‘इअर डाउन’ असा उल्लेख नसल्याने महाविद्यालय व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेशाला अडचण येते. याबाबत विद्यापीठाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. (Difficulty for admission to those who have wasted years abvp protest against mismanagement of Pune University Nashik)

विद्यापीठाच्या येथील उपकेंद्र आवारात परिषदेने आंदोलन करीत निवेदन दिले. निवेदन देताना ‘अभाविप’ नाशिक महानगरमंत्री ओम मालुंजकर, महानगर सहमंत्री प्रगती काळे, राज चव्हाण, आर्यन भैसे, कुणाल कोरे, भावेश परदेशी, वैभव दराडे, झहीर पठाण, प्रदीप लोखंडे, मेघना जाधव, ‘अभाविप’ कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, की नाशिकमध्ये अनेक महाविद्यालयांकडून विद्यापीठात विद्यार्थ्यांचे गुण पाठविणे राहून जाते.

अशा वेळेस महाविद्यालय विद्यापीठावर आणि विद्यापीठ महाविद्यालयावर आरोप करण्यात व्यस्त राहते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते. विद्यार्थ्यांचे निकाल लवकर लागत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढच्या सत्रासाठी प्रवेश घेता येत नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT