नाशिक

पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ यांचे निधन

CD
फोटो : H31885 पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ यांचे निधन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १० : येथील प्रसिद्ध पक्षीमित्र, निसर्ग अभ्यासक आणि लेखक दिगंबर गाडगीळ (वय ९१) यांचे शनिवारी (ता. १०) सकाळी सातला वृद्धापकाळाने निधन झाले. पर्वती (पुणे) येथे ते निवासी होते. त्यांच्या मागे दोन भाऊ, पुतणे, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. दिगंबर गाडगीळ यांनी चार दशकांहून अधिक काळ महाराष्ट्रात पक्षी निरीक्षण, पक्षीसंवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीचे मोठे कार्य केले आहे. ‘पक्षीगाथा’ यांसारख्या पुस्तकांच्या माध्यमातून पक्ष्यांच्या जगण्याची व विविध बारीकसारीक गोष्टींची रंजक माहिती त्यांनी मांडली. गाडगीळ यांना महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेतर्फे प्रतिष्ठित ‘पक्षीमित्र जीवनगौरव पुरस्कार’ (२०२३) प्रदान करण्यात आला होता. त्यांनी ‘महाराष्ट्र पक्षीमित्र’ या त्रैमासिकाचे संपादनही केले आहे. २८ जानेवारी १९३५ रोजी जन्मलेल्या गाडगीळ यांनी पक्ष्यांचा अभ्यास, पक्षीसंवर्धन आणि पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी दीर्घकाळ योगदान दिले. १९८१ मध्ये नाशिकच्या पक्षिमित्र मंडळाचे संस्थापक सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. १९८६ मध्ये नाशिक येथे झालेल्या सहाव्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाच्या आयोजनात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. १९९४ ते २००० या काळात त्यांनी महाराष्ट्र पक्षिमित्र संस्थेचे संघटक आणि उपाध्यक्ष म्हणूनही काम केले. २००४ मध्ये नांदेड येथे झालेल्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्यांच्या निधनाने नाशिकच्या पक्षिमित्र चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Accident: यूएईमध्ये भीषण अपघात; मृत्युमुखी पडलेल्या १३ जणांत भारतीयांचाही समावेश

आला रे आला! दोन वर्षांनंतर स्टार खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यास तयार; लिलावात नोंदवलं नाव, बेस प्राइज किती?

Shirur Crime News : शिरूरच्या मुंबई बाजारात भरदिवसा घरफोडी; दोन तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लाख दहा हजारांची रोकड चोरीला

Kaygaon News : ऊस दरावरून पंचायत समिती सदस्य बळीराम खताळ आक्रमक; चेअरमन कृष्णा पा. डोणगावकर यांनी पाठवली एक कोटींची मानहानी नोटीस

Bhau Flex Kadha Portal : फ्लेक्सविरोधात पुणेकर सरसावले! ‘भाऊ फ्लेक्स काढा’ पोर्टलवर पहिल्याच दिवशी १५० हून अधिक तक्रारी

SCROLL FOR NEXT