नाशिक

उपक्रमशिल शिक्षणामुळे लंगडीभवानी जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेत वाढ

CD
(टुडे पान एक ॲन्कर) ---------- फोटो : NSK26H31384 नंदुरबार : शाळेची दुमजली प्रशस्त इमारत. फोटो : NSK26H31386 नंदुरबार : शाळेची परसबाग. ---------- फोटो : NSK26H31391 : प्रिती पावरा, सरपंच) फोटो : NSK26H31385 : प्रकाश मोरे, मुख्याध्यापक) -------------- लंगडीभवानी : येथील जिल्हा परिषद शाळेतील डिजीटल वर्ग. --------- लंगडीभवानी जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेत वाढ उपक्रमशील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी शिक्षणाची गोडी संजय मिस्तरी : सकाळ वृत्तसेवा वडाळी, ता. ५ : रिस्पेक्टेड चीफ गेस्ट, टिचर, सिनियर सिटीझन, व्हिलिजियर, डियर स्टुडन्स् हे शब्द इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांचे नसून दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ऐकायला मिळत आहेत. शहादा तालुक्यातील लंगडीभवानी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक उपक्रमशील शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी शिक्षणाची गोडी निर्माण करीत आहेत. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत आज नव्वदपेक्षा जास्त विद्यार्थी असून, येथील विद्यार्थी अस्सल इंग्रजीत एकमेकांशी संभाषण करताना दिसत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना तोड देत या शाळेने गुणवत्ता जोपासत सृजनशील व प्रेरणादायी वाटचाल सुरू केली आहे. शिक्षणाचा दर्जा उत्तम राखला जात असल्याने परिसरातील पालक आपल्या पाल्यांना या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी धडपडत असतात. नंदुरबार या जिल्ह्याच्या ठिकाणापासून तब्बल नव्वद किलोमीटर अंतरावर शहादा तालुक्यांतील शेवटच्या टोकावर लंगडीभवानी हे शंभर टक्के आदिवासी वस्ती असलेले गाव आहे. गावात पावरा आणि आदिवासी बोलीभाषा बोलली जाते. त्यामुळे इंग्रजी भाषेचा दुरपर्यत संबध नाही. मात्र, या शाळेला लाभलेले पाचही शिक्षक उपक्रमशील असून, त्यांनी आपल्या अध्ययन कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शाळेचा चेहरामोहरा बदलला आहे. ग्रामस्थांना घेऊन शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावर भर दिला आहे. --------- तीन लाखांची लोकवर्गणी जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल करण्यासाठी येथील ग्रामस्थांनी एकाच दिवसांत तीन लाखाची लोकवर्गणी जमा केली. त्यातून आवश्‍यक त्या सुधारणा धडवून आणल्या. शिक्षकांची दैनंदिन अध्ययन पद्धत उपक्रमशिल बनविली. स्मार्ट टिव्हीवरून मिळणारे अभ्यासक्रमांचे धडे गिरवत मराठीबरोबर इंग्रजी पाठांतराचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेतला जातो. यामुळे शाळेतील शंभर टक्के विद्यार्थी आज वाचन- लेखनात पारंगत आहेत. प्रत्येक राष्ट्रीय सणाला विद्यार्था अस्सल इंग्रजीत भाषण करतात. शाळेला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांशी चक्क इंग्रजीत संवाद साधतात. प्रभारी मुख्याध्यापक प्रकाश मोरे, विलास पाटील, दिलीप पावरा, कॉलरसिंग पावरा, अशोक खैरनार असे पाच शिक्षक या शाळेत अध्यापनाचे कार्य करीत आहेत. ------- शाळेचा विद्यार्थी बनला गावातील पहिला डॉक्टर वनविभागाकडून वर्ग खोल्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. शाळेतील विद्यार्थी पटसंख्या आज २०४ आहेत. स्थलांतर होणाऱ्या पालकांचे प्रबोधन करून शिक्षणाचे महत्व पटवून दिले जाते. शिक्षणाबरोबरच विविध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, स्पर्धा परिक्षा अभ्यासाठी विशेष शिष्यवृती व मार्गदर्शन वर्ग घेतले जातात. परसबागेतून पिकविलेल्या भाजीपाल्यांतून दैनंदिन पोषण आहार दिला जातो. निसर्गाच्या सानिध्यात दुमजली शाळा इमारत उभारण्यात आली असून, परिसरात विविध प्रकारचे ३०० ते ४०० वृक्ष लावण्यात आले आहेत. याच शाळेचा विद्यार्थी असलेले डॉ. सचिन पावरा हे गावातील पहिले एमबीबीएस डॉक्टर झाले आहेत. ---------- गुणवतापूर्ण शिक्षण हाच शिक्षणाचा पाया आहे. यासाठी ग्रामस्थांची शाळेप्रति असलेली निष्ठा महत्वाची ठरली आहे. लोकसहभागातून शाळेचे रूप बदलले असून, त्यात सहकारी शिक्षकांनी अध्यापनात घेतलेली मेहनत कामी येत आहे. - प्रकाश मोरे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, लंगडीभवानी ---------- शालेय शिक्षण समिती व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी लोकवर्गणीतून शाळा डिजिटल करण्यासाठी परिश्रम घेतले. शाळेची प्रत्येक वर्गखोली डिजिटल करण्यासाठी शालेय समिती पुढाकारा घेत आहे. ग्रामपंचायत स्तरावरून आवश्यक मदतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. - प्रीती निलेश पावरा, सरपंच, लंगडीभवानी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNEUMONIC PLAGUE: रशियातील लॅबमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा मृत्यू; नक्की काय आहे 'न्यूमोनिक प्लेग'? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

Dearness Allowance Hike: कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! व्हेरिएबल डीए वाढला; नेमका किती आणि कोणाला फायदा होणार?

२ केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट होणार, मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदलाच्या चर्चांना उधाण; ५ जागा रिक्त, आप-शिवसेनेला संधी?

Australia A विरुद्ध सुरु होणार ODI मालिका! हार्दिक, नमनची माघार; तरीही भारताची तगडी फौज मैदानात; जाणून घ्या डिटेल्स

Pune News : मनोज जरांगे यांना प्रश्‍न विचारल्‍याने ट्रोलधाड; रेखा कोंडे यांचा जरांगेंवर आरोप, टेंडर प्रक्रियेवरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT