नाशिक

शिरपूर, आवडेल तिथे प्रवास

CD
एस.टी.च्या ‘आवडेल तिथे प्रवास’ योजनेला डिजिटल गती घरबसल्या मोबाईलवरच मिळणार पास; रांगांतून सुटका सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. ३ : बस प्रवास करून पर्यटनाच्या माध्यमातून नियमित भ्रमंती करणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आणखी एक दिलासादायक पाऊल उचलले आहे. एस. टी. महामंडळाची अत्यंत लोकप्रिय असणारी ‘आवडेल तिथे कोठेही प्रवास पास’ ही योजना आता पूर्णपणे डिजिटल झाली असून, प्रवाशांना हे पास थेट ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे बसस्थानकांवरील तिकीट खिडक्यांसमोरील लांबलचक रांगा आणि कागदी पासेसची समस्या निकाली निघणार आहे. यापूर्वी हे पासेस आगारांमधून केवळ हस्तलिखित पद्धतीने वितरित केले जात होते. प्रवाशांचा वेळ वाचावा आणि सेवेत पारदर्शकता यावी यासाठी महामंडळाने npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर ही ऑनलाईन प्रणाली सुरू केली आहे. या पोर्टलवरून प्रवासी ४ दिवस आणि ७ दिवसांचे पासेस घरबसल्या काही मिनिटांत काढू शकतात. ऑनलाईन घेतलेला पास कागदावर प्रिंट स्वरूपात किंवा थेट मोबाईलमधील पीडीएफ (PDF) स्वरूपात दाखवला तरी तो प्रवासासाठी वैध धरला जाईल. प्रवासादरम्यान वाहक (कंडक्टर) त्यांच्या ईटीआय (ETI) मशीनद्वारे पासवरील क्यूआर कोड स्कॅन करून त्याची पडताळणी करतील. ओळखपत्र बाळगणे बंधनकारक ऑनलाईन पासधारक प्रवाशांना प्रवासादरम्यान स्वतःचे मूळ वैध ओळखपत्र- आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा डिजीलॉकरमधील (DigiLocker) डिजिटल ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असणार आहे. प्रवासादरम्यान क्यूआर कोड स्कॅन न झाल्यास किंवा कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवल्यास प्रवाशांच्या मदतीसाठी महामंडळाने ०८०६५९०३२७२ आणि ०८०६५९०३२७३ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. ------- प्रवाशांचा वेळ वाचवणारी आणि आधुनिक प्रवासाला दिशा देणारी ही नवी प्रणाली आहे. ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांतील पर्यटकांना आणि नियमित प्रवाशांना आता आगारात चकरा मारण्याची गरज उरणार नाही. प्रवाशांनी या डिजिटल सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. - महेंद्र पाटील, आगार व्यवस्थापक --------- तांत्रिकदृष्ट्या ही प्रणाली अत्यंत सुरक्षित आणि सुटसुटीत आहे. वाहकांच्या हातातील ईटीआय मशीनवर थेट क्यूआर कोड स्कॅन होणार असल्याने पडताळणी झटपट होईल आणि बनावट पासेसना आळा बसेल. प्रवाशांनी प्रवासात केवळ वैध ओळखपत्र जवळ ठेवावे, जेणेकरून तपासणीदरम्यान कोणतीही अडचण येणार नाही. - मनोज पाटील, सहायक वाहतूक अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : आरोपी नीलेश आरते याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT