पान-३
------------
कुंभमेळ्यात गर्दीचा अंदाज तासभर आधीच
-----------
नाशिकमध्ये उभारणार ''डिजिटल ट्विन'', उपाययोजनेला मिळणार संधी
-----------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.४ ः कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी टाळण्यासाठी आणि गर्दीचे अचूक नियोजन करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने अत्याधुनिक ''डिजिटल ट्विन'' प्रणाली उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या तंत्रज्ञानातून संपूर्ण कुंभक्षेत्राचे संगणकीय आभासी प्रारूप तयार होणार आहे. ते एकात्मिक नियंत्रण कक्ष आणि जीआयएस नकाशांशी जोडले जाईल. सीसीटीव्ही, नदीची पाणीपातळी, पाऊस, धरण विसर्ग, पार्किंग आणि बस वाहतूक यांची माहिती एकाच व्यासपीठावर दिसणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुढील १५ ते ६० मिनिटांतील गर्दी आणि वाहतूक कोंडीचा अंदाज या प्रणालीला येणार आहे. त्यामुळे धोका निर्माण होण्याआधीच प्रशासनाला उपाय करता येतील.
---------------
१२ नोव्हेंबरला महत्त्वाची बैठक
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली १२ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता त्र्यंबक नाका येथील प्राधिकरण कार्यालयात आंतरविभागीय बैठक होणार आहे. पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक, एसटी, आरोग्य, जलसंपदा, अग्निशमन आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देश दिले आहेत.
---------------
पाच कंपन्या अंतिम फेरीत
प्राथमिक टप्प्यातील १० कंपन्यांना नाशिकची प्रत्यक्ष माहिती दिली जाणार आहे. सीसीटीव्ही, वाहतूक आराखडा आणि पूरस्थितीच्या आधारे १५ दिवसांत प्रारूप तयार करून प्रात्यक्षिक द्यावे लागणार आहे. प्रशासकीय समितीच्या मूल्यांकनानंतर अंतिम ५ कंपन्यांची मुख्य निविदेसाठी निवड होणार आहे.
--------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.