नाशिक

दुष्काळाशी लढण्यासाठी बागलाणला योजनांचे कवच कृषी पंपांची मर्यादा वाढविण्यापासून फळबागांना दोन हेक्टरपर्यंत क्रॉप कव्हर; बळीराजा पाणी योजनेत तालुक्याच्या समावेशासाठी पाठपुरावा : आमदार दिलीप बोरसे

CD
फोटो ओळी-07387 सटाणा ः पत्रकार परिषदेत बोलताना आमदार दिलीप बोरसे. बळीराजा योजनेत समावेशासाठी पाठपुरावा करणार आमदार दिलीप बोरसे यांची पत्रकार परिषदेत माहिती सकाळ वृत्तसेवा सटाणा, ता. ८ : पावसाची अनिश्चितता आणि पाण्याच्या टंचाईने बागलाणच्या शेतीसमोर उभ्या राहिलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी शासनदरबारी योजनांचा पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार दिलीप बोरसे यांनी दिली. शेतकऱ्यांना अधिक क्षमतेचे कृषिपंप वापरण्याची मुभा मिळावी, फळबागांना दोन हेक्टरपर्यंत क्रॉप कव्हर मिळावे आणि बळीराजा पाणी योजनेत बागलाणचा समावेश व्हावा, यासाठी शासनाकडे आग्रह धरणार असल्याचे आश्वासन आमदार दिलीप बोरसे यांनी दिले. आमदार बोरसे यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार बोरसे म्हणाले, की दुष्काळात उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब शेतीसाठी वापरता यावा, यासाठी साडेसात अश्‍वशक्तीच्या पुढील कृषिपंपावरील मर्यादा वाढविण्याचा मुद्दा शासनापुढे मांडणार आहे. विहिरी, कूपनलिका आणि उपलब्ध जलस्रोतांमधून शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपसता यावे, हा त्यामागील उद्देश आहे. बागलाणची अर्थव्यवस्था फळबागांवर अवलंबून असल्याने द्राक्ष, डाळिंबासह इतर फळबागांना दुष्काळाचा फटका बसू नये, यासाठी दोन हेक्टरपर्यंत क्रॉप कव्हरचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वनपट्टेधारक शेतकऱ्यांना जमीन सपाटीकरण आणि बोअर घेण्यासाठी परवानग्या मिळाव्यात, यासाठीही संबंधित विभागांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बळीराजा पाणी योजनेत बागलाणचा समावेश करून तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न राहणार आहे. तसेच आरम नदी संवर्धनातून साठा आणि भूजलपातळी वाढविण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दुष्काळाच्या छायेतही सटाणा शहराचा विकास थांबणार नसून भुयारी गटार योजना तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते आघार रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी संकटात असताना सत्कार-स्वागतापेक्षा जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून, वर्षभर सत्काराला फाटा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत भाजपचे तालुकाध्यक्ष शरद भामरे, प्रवीण पवार, शहराध्यक्ष नितीन सोनवणे, पालिकेतील भाजपचे गटनेते चेतन रौंदळ, सुमित वाघ, विलास दंडगव्हाळ, महेश सोनवणे, अनिल पाकळे, पोपटराव बच्छाव, नितीन बोरसे, अनिल जाधव,भाऊसाहेब भामरे आदी उपस्थित होते. .......... चौकट विरोधकांचा कांगावा माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी भाजपने लावलेल्या बागलाण तालुका दुष्काळ जाहीर झाल्याबद्दल शासनाचे मानलेले आभार या मुद्द्यावरून भाजपवर हा दुष्काळाचा उत्सव आहे का, अशी जाहीर टिप्पणी केली होती. त्या टीकेला भाजपचे तालुकाध्यक्ष प्रवीण पवार व शरद भामरे यांनी उत्तर देत तालुक्याचा चौफेर झालेला विकास सहन होत नाही म्हणून विरोधकांचा हा कांगावा असल्याचा आरोप केला. ...........

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

India Alliance Protest : 'देश हायजॅक केलाय, लोकशाहीची हत्या सुरूय'; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आंदोलनासाठी 300 खासदार राजघाटावर

NANA PATEKAR: नाना पाटेकर रोज ६० सिगारेट ओढायचे; वयाच्या ५६व्या वर्षी सोडली सवय, पण हृदयाला झालेलं नुकसान भरून निघतं का? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update: उदगीरमध्ये भरदिवसा दोन घरांवर डल्ला; सहा लाखांचा ऐवज लंपास

Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे Cardiac Arrest ने निधन; हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? शरीरात नेमकं काय घडतं?

SCROLL FOR NEXT