नाशिक

दुष्काळी तालुक्यात दिंडोरीचा समावेश

CD
दिंडोरीचा दुष्काळी यादीत समावेश नाशिक पुन्हा वंचित; जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या १४ वर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१७ : दिंडोरी तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (ता. १७) दिले. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या १४ झाली आहे. मात्र, दिंडोरीला दिलासा मिळत असताना नाशिक तालुक्याचा दुष्काळी यादीतील समावेश पुन्हा एकदा रखडल्याने नाराजी व्यक्त होत आहे. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या दुष्काळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत दिंडोरीसह पालघर जिल्ह्यातील वाडा व विक्रमगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. दिंडोरीच्या समावेशामुळे तालुक्यात दुष्काळ निवारणाच्या अनुषंगाने विविध १२ उपाययोजना लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा प्रशासनाने नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही तालुक्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. मात्र, दिंडोरीचा समावेश करण्यात आला असताना नाशिक तालुका पुन्हा वगळण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. पालकसचिवांकडून जिल्हानिहाय आढावा राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून उपाययोजनांना गती देण्यासाठी पालकसचिवांनी अधिवेशनापूर्वी सर्व जिल्ह्यांना भेटी द्याव्यात, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले. या दौऱ्यात दुष्काळाच्या सर्व निकषांनुसार परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन अहवाल मुख्य सचिवांकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. पाणीटंचाई निवारणासाठीच्या दहा उपाययोजनांबाबतचा निर्णय दोन दिवसांत जाहीर केला जाणार आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीकडील उपलब्ध निधीतून जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाई निवारणाची कामे हाती घ्यावीत, अशा सूचनाही बावनकुळे यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''उत्तर प्रदेशमध्ये आम्हाला मुस्लिम मुख्यमंत्री पाहिजे'', मौलाना साजिद रशिदी यांचा विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला

Pimpri Dairy Farm Flyover : डेअरी फार्म उड्डाणपुलाचा फायदा की नवा धोका? राँग साइड वाहनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मंगळचा केतूच्या नक्षत्रात प्रवेश; पुढील ३२ दिवस 'या' ३ राशींना बसू शकतो फटका!

Kaygaon News : ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक; जुने कायगाव येथील शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित

Pune sugarcane rate : ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी पुढाकार घेणार का? सर्व कारखानदार, शेतकरी आणि संघटनेच्या प्रतिनिधींच्या बैठकीची मागणी

SCROLL FOR NEXT