नाशिक

दिंडोरीत राष्ट्रवादीचा रास्ता रोको शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन; दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

CD
फोटो- 13131 दिंडोरी ः राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे सोमवारी नाशिक- वणी रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केलेला रास्ता रोको. दिंडोरीत राष्ट्रवादी काँग्रेसचा रास्ता रोको तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करण्याची मागणी सकाळ वृत्तसेवा वणी, दिंडोरी, ता. ५ : तालुक्यातील शेतकरी, नागरिक आणि आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे सोमवारी (ता. ५) दिंडोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार मुकेश कांबळे यांना देण्यात आले. ......... शेतकऱ्यांना खतांचा मुबलक पुरवठा करावा, खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी, शेतीसाठी आठ तास अखंडित वीजपुरवठा करावा, वारंवार वीज खंडित होण्याचा प्रश्न सोडवावा, तालुक्यातील खराब रस्त्यांची दुरुस्ती करावी, धरणातील पाणी दिंडोरी तालुक्यासाठी आरक्षित ठेवून कालव्यांची दुरुस्ती करावी, तसेच पाणीयोजना सुरळीत कराव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या. आदिवासी आश्रमशाळांमधील समस्या सोडवाव्यात, वनपट्टे, घरकुल आणि जात दाखल्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढावेत, अशी मागणीही आंदोलकांनी केली. तालुक्यातील शेतकरी दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जात असल्याने दिंडोरीचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली. जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दुष्काळी मदत, शेतीसाठी वीज, पाण्याचे नियोजन आणि पीक नुकसानीचे प्रश्न मांडले. तालुकानिहाय निकष न लावता गाव व सर्कलनिहाय वस्तुनिष्ठ पाहणी करून निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. सोयाबीन, मका, भाजीपाला, गहू आणि टोमॅटो यांसारख्या पिकांचे नुकसान झाले असून, वीजपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी सिंचन करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्पदंश तसेच विजेच्या धक्क्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तालुक्यातील एमआयडीसीत स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे आणि परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालावा, अशा मागण्याही मांडण्यात आल्या. मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज खांदवे, जेष्ठ नेते आबासाहेब देशमुख, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष तौसिफ मणियार, संतोष रेहरे, अशोक नायकवाडे, गंगाधर निखाडे, संदीप फेरे, रोशन धगे, राहुल उगले, संजय घाडगे, हिरामण खंदवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT