नाशिक

वणी - राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनात दिंडोरी तालुक्याची दमदार कामगिरी

CD
३६-४ दिंडोरीतील ४० उपकेंद्रांना राज्यस्तरीय मानांकन ------------ राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्रक्रिया ः गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेकडे पाऊल ------------ सकाळ वृत्तसेवा वणी, ता.१३ : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन प्रक्रियेच्या निकालानुसार जिल्ह्यातील एकूण ६५ आरोग्य उपकेंद्रांना राज्यस्तरीय मानांकन प्राप्त झाले आहे. यामध्ये दिंडोरी तालुक्याने विशेष उल्लेखनीय कामगिरी केली असून तालुक्यातील एकूण ४८ उपकेंद्रांपैकी तब्बल ४० उपकेंद्रांनी राज्यस्तरीय मानांकन मिळवण्याचा बहुमान संपादन केला आहे. ---------------- दिंडोरी तालुक्यात यंदा मानांकन प्राप्त झालेल्या ३१ उपकेंद्रांमध्ये दहिवी, देवसाने, फोफळवाडे, हस्तेदुमाला, जालखेड, जांबुटके, निळवंडी, वलखेड, जानोरी १, जानोरी २, जोपुळ, करंजवण, खडकसुकेणे, कोकणगाव, कोशिंबे, लखमापूर, मडकिजांब, म्हाजे, मातेरवाडी, मावडी, नाळेगाव, पालखेड, पिंपळणारे, पिंप्रीअंचला, राजापूर, रासेगाव, रवळगाव, ठेपणपाडा, तिसगाव, टिटवे आणि पळसविहीर या उपकेंद्रांचा समावेश आहे. यापूर्वी तालुक्यातील नवेदेगाव, कोऱ्हाटे, चौसाळे, आंबेवणी, आंबेगण, अहिवंतवाडी, अंबानेर, चिंचखेड आणि आंबेदिंडोरी या नऊ उपकेंद्रांना राज्यस्तरीय मानांकन प्राप्त झाले होते. त्यामुळे यापूर्वीच्या नऊ आणि यंदाच्या ३१ अशा एकूण ४० उपकेंद्रांनी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन मिळवले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुरक्षित व तत्पर आरोग्यसेवा देण्यासाठी आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. यापुढेही उर्वरित उपकेंद्रांना मानांकन मिळवून देण्यासह आरोग्यसेवेचा दर्जा अधिक उंचावला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे व डॉ. हर्षल नेहते, गटविकास अधिकारी सुनील पाटील तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. नीलिमा बच्छाव आणि आरोग्यसेवक परमेश्वर म्हस्के यांनी विशेष परिश्रम घेतले. दिंडोरी तालुक्यातील आरोग्य विभागाने मिळवलेले हे यश ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात असून, गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेच्या दिशेने टाकलेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. ------------ कोट दिंडोरी तालुक्यातील ४८ पैकी ४० आरोग्य उपकेंद्रांना NQAS अंतर्गत राज्यस्तरीय गुणवत्ता मानांकन मिळणे ही संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे. हे यश केवळ एका व्यक्तीचे नसून सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविकांच्या सांघिक मेहनतीचे फलित आहे. - डॉ. युवराज देवरे, तालुका आरोग्य अधिकारी, दिंडोरी. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

IND vs NZ 4th ODI: विराट कोहली शून्यावर क्लिनबोल्ड अन् झाली सचिन तेंडुलकरच्या 'नकोशा विक्रम'शी केली बरोबरी

NTA Reform: NEET मधील पेपरफुटीनंतर मोठा निर्णय; गैरप्रकार रोखण्यासाठी आता थेट लष्करी अधिकाऱ्यांना...

IND vs NZ: शेवटच्या वनडेत खेळणार नाही मॅट हेन्री, विराट कोहलीने जर्सी भेटही दिली; पण कारण काय?

SCROLL FOR NEXT