नाशिक

पोलिस उपनिरीक्षकाच्या कारने कामगाराला चिरडले -

CD
LKH26B05092 दिंडोरी ः धडक देणारी कार. -------- LKH26B05093 ः शिवदत्त शिंदे -------- ३०-२ पोलिस उपनिरीक्षकाच्या कारने कामगारास चिरडले -------- सकाळ वृत्तसेवा लखमापूर, ता. ६ ः वणी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संतोष छगन कडाळे यांच्या भरधाव फोर्ड कारने ओव्हरटेकच्या प्रयत्नात चुकीच्या बाजून जात दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील लखमापूर येथील श्वेता प्रिंटस व पॕकिंग कंपनीचे कामगार शिवदत्त सुखदेव शिंदे हे जागीच ठार झाले. दिंडोरी येथील नवीन तहसील कार्यालयाजवळ सोमवारी (ता.५) रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. -------------- पोलिस उपनिरीक्षक संतोष कडाळे यांच्यावर दिंडोरी पोलिसांनी अपघात व मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः शिवदत्त शिंदे हे कंपनीतील काम आटोपून दिंडोरी येथे राज्य मार्गावरुन टिव्हीएस कंपनीच्या दुचाकीने (एमएच १५, जेजे ८५४५) जात असताना समोरुनन भरधाव आलेल्या संतोष कडाळे यांच्या फोर्ड कारने (एमएच १५, इएक्स ९६६९) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या चुकीच्या बाजून जात दुचाकीला जोरदार धडक दिली. यात गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याने शिवदत्त सुकदेव शिंदे हे जागीच ठार झाले. संतोष कडाळे हे जखमी झाले. कार व दुचाकीचे नुकसान झाले. संदीप सुकदेव शिंदे यांच्या फिर्यादीवरुन पोलिस उपनिरीक्षक संतोष छगन कडाळे यांच्याविरोधात दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर कडाळे यांच्या वैद्यकीय तपासणीबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे तपास करत आहेत. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

Marathi News Live Updates: राहुल गांधींचा आठ तासांपासून ठिय्या

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

SCROLL FOR NEXT