नाशिक

दिंडोरीतील खड्डेमय रस्त्यांना जबाबदार उपकार्यकारी अभियंता गौरव जगताप यांचे त्वरित निलंबन करा

CD
पान-२ मेन LKH26B05095 दिंडोरी ः दिंडोरी शहरातील रस्‍ते आणि त्यावरील खड्ड्याप्रकरणी अभियंत्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी. ----------- दिंडोरीतील खड्ड्यांप्रश्नी रास्तोरोको ----------- राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक ः जबाबदार अभियंत्यांच्या निलंबनाची, रस्ते दुरुस्तीची मागणी करा ------------- सकाळ वृत्तसेवा लखमापूर, ता.६ ः दिंडोरी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कथित भोंगळ कारभारामुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांचे साम्राज्य यास थेट जबाबदार धरत उपकार्यकारी अभियंता गौरव जगताप यांचे त्वरित निलंबन करण्यात यावे या मुख्य मागणीसह तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे दिंडोरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ---------------- दिंडोरीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाशिक- कळवण रस्त्यावर जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील आणि अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तौसिफ मणियार, तालुकाध्यक्ष मनोज खांदवे यांच्या नेतृत्वाखाली एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकार आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. उपकार्यकारी अभियंत्यांचे निलंबन, तालुक्यात निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचा तत्काळ ''दुष्काळग्रस्त'' यादीत समावेश करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे त्वरित निलंबन करावे, तालुक्यातील जनतेला धरणातील पाणी प्राधान्याने द्यावे अशीही आक्रमक मागणी करण्यात आली. ----------- सुमारे एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे नाशिक- कळवण मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ज्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार मुकेश कांबळे यांना देण्यात आले. पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपकार्यकारी अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पक्षातर्फे देण्यात आला आहे. संतोष रेहरे, गंगाधर निखाडे, रोशन ढगे, संदीप भेरे, संतोष लोखंडे, गुलाब शिंगाडे, मोहम्मद सय्यद आदीसह नागरिक उपस्थित होते. ----------- १६-१ चौकट झिरवाळ यांच्यावर टिका मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावरही जोरदार टीका करण्यात आली. मंत्रिपद असूनही तालुक्यातील जनतेला खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागत आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. -------------

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT