फोटो- 13138
दिंडोरी ः महावितरणचे कनिष्ठ अभियंता समाधान पाटील यांना निवेदन देताना शिवसेनेचे (उबाठा) पदाधिकारी.
दिंडोरीत महावितरणला
शिवसेनेचे (उबाठा) निवेदन
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. ७ : तालुक्यातील नागरिकांना वाढीव वीजबिलांचा फटका बसत असताना त्यांच्यावर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, स्मार्ट मीटरची मोहीम थांबवावी आणि शहरासह ग्रामीण भागातील खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आली. यासंदर्भात महावितरणच्या दिंडोरी उपविभागाचे कनिष्ठ अभियंता समाधान पाटील यांना निवेदन देण्यात आले.
महावितरणकडून दिंडोरी शहरासह तालुक्यात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र, यामुळे ग्राहकांना अवाढव्य वीजबिले येत असून, सर्वसामान्य ग्राहकांमध्ये असंतोष आहे. आधीच वाढीव वीजबिलांच्या समस्येने त्रस्त ग्राहकांना स्मार्ट मीटरची सक्ती करून त्यांच्या अडचणी वाढवू नयेत, असे निवेदनात म्हटले आहे.
शहरासह तालुक्यात काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, व्यापारी आणि शेतकरी त्रस्त आहेत. अचानक वीजपुरवठा खंडित होण्यामुळे व्यावसायिकांचे नुकसान होत असून, विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसत आहे. महावितरणने तत्काळ स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी आणि शहरासह ग्रामीण भागाला सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख, मनसे उपजिल्हाप्रमुख मनोज ढिकले, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, अमोल उगले, शहरप्रमुख रोहित जंगम, युवा तालुका अधिकारी नीलेश शिंदे, शहरप्रमुख नीलेश देशमुख, माजी शहरप्रमुख गोपीनाथ पिंगळ, उत्तम उगले, कैलास जाधव, अनिल पिंगळे, शेखर कांबळे, विजय पवार, सचिन आव्हाड, कैलास गणोरे, बाळासाहेब बेंडकुळे, असिफ अत्तार, शहाबाज अत्तार आदी उपस्थित होते.
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.