पान चार
--------------
13063
दिपालीनगर: दिपावली मैफलीत दीपोत्सवाचा दिप प्रज्वलन करून प्रारंभ करताना आमदार देवयानी फरांदे, शेजारी गायक अभिजीत कोसंबी, प्रा.सुनील फरांदे, ॲड. श्याम बडोदे, यशवंत निकुळे, मंगला नन्नावरे आदी.
अभिजित कोसंबी यांच्या
मैफीलने रंगली पाडवा पूर्वसंध्या
सकाळ वृत्तसेवा
इंदिरानगर, ता. १२ : पार्श्वगायक अभिजीत कोसंबी यांनी सादर केलेल्या ‘मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया’, ‘माऊली माऊली’, ‘राधा ही बावरी’, अशी एक से एक गीते आणि त्याला समोर बसलेल्या शेकडो रसिकंच्या टाळ्या आणि वन्स मोअरची मिळणारी दिलखुलास दाद अशा उत्साही वातावरणात दिपाली नगर येथील छाजेड उद्यानात अनुभवास मिळाले. निमित्त होते विनय नगर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्था आणि प्रभाग क्रमांक २३ च्या नगरसेविका रूपाली निकुळे आणि माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांनी दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या दिपावली सांज मैफल आणि दीपोत्सवाचे.
महेश धोडपकर प्रस्तुत या मैफलीत अभिजित यांना अपर्णा माडीवाले आणि मीनल थोडपकर यांनी ‘माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली,’ ‘चला जेजुरीला जाऊ’, आदी गीतांसह "हाई झुमकावाली पोरं " हे अहिराणी गीत सादर करून खंबीर साथ दिली .सचिन जाधव यांच्या बहारदार निवेदनाने मैफिलित रंग भरले. अनिल धुमाळ, देवानंद पाटील, प्रतीक पाटील यांनी साथसंगत दिली. दरम्यान येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराच्या प्रांगणात आणि उद्यान परिसरात उपस्थित श्रोत्यांनी सोबत आणलेल्या शेकडो पणत्या एकाच वेळी प्रज्वलित केल्याने या दिपोत्सवात संपूर्ण उद्यान लख्ख झाले होते.
या वेळी आमदार देवयानी फरांदे, ज्येष्ठ नेते प्रा.सुहास फरांदे, प्रा.सुनील फरांदे, भाजप गटनेता ॲड.श्याम बडोदे, पूर्व विभाग सभापती मंगला नन्नावरे, नगरसेवक चंद्रकांत खोडे, संध्या कुलकर्णी, सुप्रिया खोडे, डॉ.दीपाली कुलकर्णी, ॲड.अजिंक्य साने, प्रकाश नन्नावरे, मनिषा खोडे, सचिन कुलकर्णी, सुनील खोडे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.