नाशिक

‘जिल्हाधिकारी’त आपत्ती निवारणाचे प्रात्यक्षिक

CD
‘जिल्हाधिकारी’त आपत्ती निवारणाचे प्रात्यक्षिक जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त जनजागृती सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त मंगळवारी (ता.१३) जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाविषयी जनजागृतीपर कार्यक्रम पार पडला. यावेळी आपत्तीप्रतिकारक क्षमता बांधणी तसेच शोध व बचाव कार्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने जनजागृती करण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे उपस्थित होते. यंदाच्या जागतिक आपत्ती धोके निवारण दिनाची ‘आपत्तीप्रतिकारक क्षमतेची सुरुवात घरापासून’ ही संकल्पना आहे. घर, कुटुंब आणि समाजस्तरावर आपत्तींचा सामना करण्यासाठी सज्जता निर्माण करण्यावर या कार्यक्रमात भर देण्यात आला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत यांच्या हस्ते वर्षभरात शोध व बचाव कार्यात जिल्हा प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पोलीस विभाग, महानगरपालिका अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभाग, तहसील कार्यालये, आरोग्य विभाग, वन विभाग, नेहरू युवा केंद्र संघटन, भारत स्काउट्स व गाइड्‌स तसेच आपदा मित्र आणि इतर स्वयंसेवक सहभागी झाले होते. --- कार्यक्रमात जनजागृती - उंच इमारतीतील बचावकार्याचे प्रात्यक्षिक - अग्निसुरक्षा व आग विझविण्याचे प्रात्यक्षिक - आधुनिक शोध व बचाव साहित्याचे प्रदर्शन - आपत्ती व्यवस्थापनासाठी सामूहिक सज्जतेवर भर फोटो क्रमांक : एच-32289

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; हल्लेखोर महिला दारुच्या नशेत, शिव्याही दिल्या

Pune Crime : गणेशोत्सवात दागिने चोरणारी हरियाणाची टोळी गजाआड; साडेचार हजार किलोमीटर पाठलाग करून कारवाई

Mohol News : आठव्या दिवशीही जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचे उपोषण सुरूच; प्रकृती खालावली, दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Saudi Attack: 'हल्ल्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका!'... सौदीतील भारतीयांना कोणी दिला इशारा?

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT