Raj Thackeray esakal
नाशिक

मनसेची एकी कागदावर की प्रत्यक्षात? राज ठाकरे दौऱ्यावर चर्चा

विक्रांत मते

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या (municipal election) पार्श्‍वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुढील आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी बुधवारी (ता.१५) पक्षाच्या पहिल्या व दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. परंतु, एकजूट दाखविण्याचा हा प्रयत्न कागदावरच राहतो की प्रत्यक्षात उतरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मनसेची एकी कागदावर की प्रत्यक्षात?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे २१ ते २३ सप्टेंबर या कालावधीत नाशिक दौऱ्यावर येत आहे. यापार्श्‍वभूमीवर पक्षाच्या राजगड कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार ईचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख, योगेश शेवरे, विभाग अध्यक्ष नितीन साळवे, सत्यम खंडाळे, रामदास दातीर, योगेश लभडे, महिला सेनेच्या कामिनी दोंदे, अर्चना जाधव, सुजाता डेरे आदी उपस्थित होते. राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. गेल्या साडेचार वर्षात संघटनेकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या या पावित्र्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पक्षाअंतंर्गत मोठ्या प्रमाणात वाद असल्याने ठाकरे यांनी विभाग अध्यक्षांना थेट संपर्क साधण्यासाठी खासगी भ्रमणध्वनी उपलब्ध करून दिला. यावरून वरिष्ठांकडून कनिष्ठांची होणारी अडवणूक थांबविण्यात आल्याचे स्पष्ट होते. पक्षांतर्गत वादाची खदखद बाहेर येत असल्याने निवडणुकीच्या तोंडावर ही बाब परवडणारी नसल्याची बाब समोर येत असल्याने दौऱ्याची माहिती देण्यासाठी पहिल्या व दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली.

दौऱ्यावर चर्चा

बैठकीत २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान राज ठाकरे, युवानेते अमित ठाकरे यांचा दौरा, नवीन शाखाध्यक्षांच्या नेमणुका, शाखाध्यक्षांचा मेळावा, महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी यावर चर्चा करण्यात आली. सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी केले. आभार भाऊसाहेब निमसे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BAN vs AUS: दिल्लीत जन्म, पंजाबमध्ये गिरवले क्रिकेटचे धडे अन् आता थेट ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण... कोण आहे Nikhil Chaudhary?

जय श्री राम म्हण तरच मिळणार पुरी भाजी... वृद्ध मुस्लीम व्यक्तीबरोबर भाजपा आमदाराचं असभ्य वर्तन, Video Viral

विदर्भातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास होणार आरामदायी, 'या' एक्सप्रेसमध्ये लागणार LHB कोच, रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

'हे फक्त आमिरच करू शकतो!' एकाच कारमध्ये दोन सवती आणि होणारी तिसरी बायको! व्हिडिओ पाहून चकित व्हाल

Ramdara Mandir: भाविकांसाठी महत्त्वाची सूचना! रामदरा मंदिर १८ जुलैपर्यंत बंद; गर्भगृहाच्या नूतनीकरणासाठी मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT