स्मार्ट प्रकल्पांची वाताहत sakal
नाशिक

स्मार्ट प्रकल्पांची वाताहत, नगरसेवक आक्रमक

‘एमएनजीएल’ रस्त्यांवरील खड्ड्यांना जबाबदार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वाहतूक सुरळीत करण्यासाठी सध्या शहरात सुरू असलेल्या स्मार्टसिटी कंपनीच्या ट्रायल रनचे निमित्त करून नगरसेवकांनी स्मार्टसिटीच्या कामांची गुणवत्ता व कंपनीच्या मुजोरगिरीची चिरफाड केली. स्मार्टसिटी प्रकल्पांची पाहणी करण्याबरोबरच नगरसेवकांच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिल्या.

रविवार कारंजा व निमाणी बसस्टॅण्ड परिसरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक बेटाची लांबी व रुंदी कमी करावी की वाढवावी याचा अभ्यास करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून ट्रायल रन सुरू आहे. परंतु नगरसेवक, स्थानिक नागरिक व व्यावसायिकांना विचारात न घेताच मनमानी पद्धतीने ट्रायल रन हाती घेतल्याने काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी महासभेत विशेष पत्र देवून भूमिका स्पष्ट केली. स्मार्टसिटी कंपनी म्हणजे एक अजब कोडे असून आतापर्यंत हाती घेतलेली कामे पूर्ण तर केली नाहीच.

शिवाय त्या कामांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गावठाण भागात सुरू असलेली विकासाची कामे, गोदाघाट सुशोभीकरण व घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पोहोचविण्यासाठी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे नागरिक मेटाकुटीला आल्याचे सांगत अधिकाऱ्यांच्या मुजोरपणावर बोट ठेवले. स्मार्टसिटीअंतर्गत शहरात कामे करताना नगरसेवकांना विचारले जात नसल्याचा आरोप उद्धव निमसे यांनी केला. रस्त्यांचे आकार बदरणे, पोलिस परवानगी न घेता वाहतुकीत बदल करण्याचे काम स्मार्टसिटी कंपनीकडून होत असल्याने यातून इतर विभागांच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा प्रकार असल्याचे ॲड. अजिंक्य साने यांनी सांगितले.

महापौर, सेना नगरसेवकांत शाब्दिक चकमक

स्मार्टसिटी कंपनीच्या कामकाजावर महापौर सतीश कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली. मेनरोडवरील महापालिकेच्या इमारतीच्या पायऱ्यांपर्यंत अतिक्रमण आल्याची बाब निदर्शनास आणताना अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत बदलीच्या सूचना दिल्या. नगरसेवक खैरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची उत्तरे प्रशासनाकडून घेत असताना विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी चर्चेची मागणी केली. हताश होऊ नका हा दिलेला सल्ला महापौरांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी बोरस्ते यांना उद्देशून तुम्ही स्मार्टसिटी कंपनीचे संचालक होते त्यावेळी काय केले, असा सवाल केल्यानंतर शाब्दीक चकमक उडून गोंधळ निर्माण झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT