hanuman birth place 
नाशिक

वाद हनुमान जन्मस्थळाचा; पण साधूचं भिडले, नाशकात 'खुर्ची'वरून वादंग

सकाळ डिजिटल टीम

हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी आहे की किष्किंदा, यावरून वाद सुरू झालाय. किष्किंदाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी जन्मस्थळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हनुमानाच्या जन्मस्थळाचा विषय लावून धरला. यानंतर त्यांना त्र्यंबकेश्वरच्या ग्रामस्थांनी आणि साधूसंतांनी विरोध केला आहे. (Hanuman Birth Place Controversy)

दरम्यान, या वादावर चर्चा करण्यासाठी आज शास्त्रार्थ सभा बोलावण्यात आली. त्यासाठी देशभरातील धर्म प्रतिनिधी नाशकात दाखल झाले आहेत. मात्र, यावेळी आसन व्यवस्थेवरून वादाला तोंड फुटलं.

गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी केलेल्या दाव्याचा विरोध अंजनेरी येथील ग्रामस्थांनी केला होता. दरम्यान त्यांच्या विरोधात ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केलं. त्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गाविंदानंद सरस्वती यांना नोटीस बजावली. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ही नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर आज शास्त्रार्थ सभेत वादाला आणखी फोडणी मिळाली आहे.

दरम्यान, या वादावर चर्चा करण्यासाठी आज शास्त्रार्थ सभा बोलावण्यात आली. त्यासाठी देशभरातील धर्म प्रतिनिधी नाशकात दाखल झाले आहेत. त्यांची बैठक सुरू होण्याआधीच राड्याला सुरुवात झाली. आसन व्यवस्था समसमान करण्यात आली नसल्याने काही साधूंना राग आला. स्वामींची अनिकेत शास्त्री यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, गोविंदानंतद सरस्वती स्वामी वर येऊन बसल्याने अन्य साधूंनी आक्षेप घेतला. यामुळे साधूंमध्ये 'खुर्ची'चा वाद सुरू झाला. आसनव्यवस्था समसमान करण्याची मागणी होत आहे. गोविंदानंद सरस्वती यांनी खाली बसावं अशी मागणी करण्यात आली आहे. तुम्ही विद्वान असाल, साधू असाल, मात्र आमचा मान राखावा असं नाशिकच्या साधूंनी म्हटलंय.

रास्तारोको आणि आंदोलन

गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी केलेल्या दाव्याचा विरोध अंजनेरी येथील ग्रामस्थांनी केला. दरम्यान त्यांच्या विरोधात ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. त्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गाविंदानंद सरस्वती यांना नोटीस बजावली. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ही नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर आज शास्त्रार्थ सभेत वादाला आणखी फोडणी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT