हळदीच्या कार्यक्रमात हाणामारी.jpg 
नाशिक

हळद पडली महागात!...धक्का दिल्याची विचारणा केली तर, डोक्यात बसला दगड...

सकाळवृत्तसेवा

नाशिक : अंबड शिवारातील चुंचाळे घरकुलमध्ये सुरू असलेल्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून एकाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. रागाच्या 
भरात त्याने समोर पडलेला दगड उचलून त्याने समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात टाकून दुखापत केली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अशी घडली घटना

शंकर बाबू कापसे, बाळू विश्‍वनाथ पवार, अर्जून विश्‍वनाथ पवार, निलेश फुलारे ( सर्व रा. चुंचाळे घरकुल योजना, अंबड) असे संशयितांची नावे आहेत. राजेश सोमनाथ पवार (रा. इंदिरानगर झोपडपट्टी, वाडिवऱ्हे, ता. इगतपुरी) या युवकाच्या फिर्यादीनुसार, तो गेल्या 13 फेब्रुवारी रोजी अंबडमधील चुंचाळे घरकुल येथे प्रभु कापसे यांच्या मुलीच्या विवाहाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी आला होता. त्यावेळी तो नाचत असतांना संशयितांनी त्यास धक्का दिला. धक्का दिल्याचा जाब संशयितांना विचारला असता, संशयित शंकर व बाबू कापसे यांनी त्यास शिवीगाळ केली तर, अर्जून व निलेश यांनी त्याच्या डोक्‍यात दगड मारून दुखापत केली. 

याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक बेडवाल हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Drought : मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला भाजप आमदाराची धक्काबुक्की? धाराशिवच्या व्हिडिओवरून दानवेंचा गंभीर आरोप

Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

Gadchiroli Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीने केला दौरा दुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षणासह अन्य सुविधांची पाहणी

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Edible Oil Import Duty Cut : खाद्यतेलाचे दर उतरणार?, आयात शुल्कात मोठी कपात; सणासुदीत ग्राहकांना मोठा फायदा

SCROLL FOR NEXT