deputy Registrar Office nashik esakal
नाशिक

दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा धुडगूस; एकाला केले रक्तबंबाळ

सकाळ वृत्तसेवा

सिडको (नाशिक) : येथील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ७ मध्ये गुरुवारी (ता. १०) सायंकाळी दोन जणांची हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार खरेदी-विक्री व्यवहारात दलाली करणाऱ्या एका दलालाकडून वकिलांच्या प्रतिनिधीला जबर मारहाण करण्यात आली.

सर्वसामान्य ग्राहक आणि दलाल यांच्यात नेहमीच होतात वाद

यात संबंधित रक्तबंबाळ झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. सदर दलाली काम करणारी व्यक्ती सिडको कार्यालयाचा निवृत्त कर्मचारी असल्याचेही समजते. या कार्यालयात नेहमी भरमसाट गर्दी असल्याने कुठल्याही प्रकारचा सामाजिक अंतर, तसेच मास्कचा वापर होत नसल्याने या ठिकाणी नियमांचा फज्जा उडताना दिसत आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात सर्वसामान्यांना वेगळी वागणूक, तर दलालांना स्पेशल वागणूक दिली जाते. यावर तेथील अधिकाऱ्यांचा अजिबात वचक नसल्याचे दिसून येते. त्यामुळे दलाल व सर्वसामान्य ग्राहक यांच्यामध्ये नेहमीच वाद होताना दिसतात. येथे मोठ्या प्रमाणात टेबलाखालून आर्थिक व्यवहार होत असल्याचेदेखील चर्चेला आता तोंड फुटले आहे. याबाबत वरिष्ठांनी वेळीच दखल घेणे आवश्यक आहे. अन्यथा हा दलालांचा अड्डा झाल्याशिवाय राहणार नाही. यात तिळमात्र शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT