Dignitaries distributing saffron mango saplings to guests at a wedding ceremony esakal
नाशिक

Nashik News : वऱ्हाडी मंडळींना 1111 केशर आंबा रोपांचे वाटप

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लग्नांमध्ये यापूर्वी वधूवरांना आशीर्वाद देत आहेर देण्याची पद्धत होती. काळानुरूप रूढी, परंपरा मागे पडत चालल्या आहे. गिते कुटुंबीयांनी परंपरागत हुंडा, आहेर कालबाह्य प्रथा मागे टाकत, विवाहप्रसंगी वृक्षदान केले.

विवाहास वधू- वराला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या उपस्थितांकडून गिते कुटुंबीय यांनी सुरू केलेल्या संकल्पनेचे कौतुक होत होते. (Distribution of 1111 saffron mango saplings to bridegrooms relatives Nashik News)

संगमनेर तालुक्यातील सोनाशी येथील भाऊसाहेब कारभारी गिते यांचे चिरंजीव तुषार आणि सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथील सोमनाथ कराड यांची कन्या शोभा यांचा रविवारी (ता. ३०) विवाह होता.

याप्रसंगी कारभारी (दादा) शिवार प्रतिष्ठानतर्फे ११११ केशर आंबा रोपांचे वाटप करत काळाशी सुसंगत अशी नवी प्रथा सुरू करण्यात आली. वर व वधु हे दोघेही स्थापत्य अभियंता आहेत. नाशिकचे जलसंधारण अभियंता हरिभाऊ गिते आणि संरक्षण मंत्रालयात कार्यरत शास्त्रज्ञ डॉ. एल. के. गिते यांच्या कल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

याप्रसंगी उपस्थित झालेले माजी मंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार सुधीर तांबे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, इंद्रभान थोरात, उदय सांगळे यांनी या काळाशी सुसंगत उपक्रमाचे कौतुक केले.

एरवी एखाद्या लग्न कार्यात गेले की, सर्वसाधारणपणे वधूवरांना आशीर्वाद देत त्यांना भेटवस्तू दिली जाते. मात्र, गिते कुटुंबीयांनी कुठलीही भेटवस्तू न स्वीकारली नाही. एक नवीन प्रथा पाडत, आशीर्वाद देण्यासाठी आलेल्यांना केशर आंब्याचे रोप देत होते आणि वऱ्हाडी मंडळी पण हातात आंब्याचे रोपटे घेऊन आनंदाने घरी जात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT