सूचना : याआधी कोजागरीची बातमी सेकंडमेन म्हणून दिली असून, त्याऐवजी ही बातमी सेकंडमेन घ्यावी
---------
लोगो : जिल्हा बँकेचे छायाचित्र
---------
जिल्हा बँकेची आजपासून रणधुमाळी
-------
उमेदवारांना ३० ऑक्टोबरदरम्यान अर्ज दाखल करता येणार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २५ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची आचारसंहिता सोमवारपासून (ता.२६) लागू होणार आहे. जाहीर कार्यक्रमानुसार २६ ते ३० ऑक्टोबरदरम्यान सकाळी ११ ते दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
जिल्हा बँकेत उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया होणार आहे. बँकेची पंचवार्षिक निवडणूक २९ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ३० नोव्हेंबरला मतमोजणी होऊन नवीन संचालक मंडळ विराजमान होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धुळे जिल्ह्याचे उपनिबंधक मनोज चौधरी आहेत.
गेल्या १४ ऑक्टोबरला नाशिकचे सहनिबंधक संभाजी निकम यांनी बँकेच्या २,५७१ मतदारांची यादी जाहीर केली होती. प्राथमिक विविध कार्यकारी संस्था, दूध संस्था, मालविक्री प्रक्रिया सहकारी संस्था, अर्बन सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था, पगारदार सहकारी आदी संस्थांचे सभासद मतदार आहेत. सध्या बँकेच्या २३७ शाखा व १२ लाखांहून अधिक ग्राहक आहेत. बँकेच्या सुत्रांनुसार २५ ऑक्टोबरला संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. मागील पंचवार्षिक निवडणूक २१ नोव्हेंबर २०२१ला झाली होती.
बिनविरोधाची शक्यता कमी
बँकेच्या निवडणुकीची सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुतीतर्फे ही निवडणूक बिनविरोध करण्यावर खल सुरू असला, तरी महाविकास आघाडीने पॅनल उभे करण्याचे ठरविल्याने निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे निश्चित आहे. निवडणूक दुरंगी होण्याची चिन्हे आहेत. महायुतीतर्फे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील इच्छुकांनी नेत्यांकडे आपल्याला संधी मिळाली पाहिजे, असा आग्रह धरला आहे. तिन्ही पक्षांना समान जागा देत महायुतीचे सर्व उमेदवार कसे निवडून येतील, यासाठी रणनीती आखली जात आहे. संबंधित इच्छुकांनी त्या-त्या विविध कार्यकारी सोसायटीसह मतदारसंघांत आपला जनसंपर्क सुरू केला आहे.
--------
चौकट
दिग्गजांचे कुटुंबीय रिंगणात
यंदा पंचवार्षिक निवडणुकीत सलग दहा वर्षे संचालक असलेले अपात्र ठरणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे विद्यमान मातब्बर संचालकांनी अगोदरच कुटुंबीयांतील सदस्यांच्या नावांचे ठराव करून घेतले आहेत. आता या दिग्गजांचे कुटुंबातील सदस्य रिंगणात उतरतील.
जाहीर कार्यक्रमानुसार २६ ते ३० ऑक्टोबरदरम्यान सकाळी ११ ते दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी २ नोव्हेंबरला होणार आहे. ३ नोव्हेंबरला उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३ ते १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. १८ नोव्हेंबरला सकाळी अकराला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्हवाटप होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.