जिल्हा बँक निवडणूक (लोगो)
---
उमेदवारी अर्जांची आज छाननी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची सोमवारी (ता. २) छाननी होईल. त्यात किती इच्छुकांचे अर्ज अवैध ठरतात, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप- शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध झाले. त्यानंतर आता ‘महायुती’च्या मातब्बरांनी त्यांच्या विरोधातील उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बँकेच्या निवडणुकीत विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून शिवसेनेच्या नलिनी चिमणराव पाटील (पारोळा), मृणाल अमोल पाटील (एरंडोल), तर भाजपचे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे (भुसावळ) बिनविरोध निवडून आल्या आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह एकूण ४०२ अर्ज दाखल झाले आहेत.
एकीकडे शिवसेनेने दोन जागा बिनविरोध जिंकत आघाडी घेतली असली, तरी महायुतीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये जागा वाटपावर जवळपास तोडगा निघाला असला, तरी शिवसेना आणि भाजपमध्ये काही जागांवरून अजूनही पेच कायम आहे. या पार्श्वभूमीवर जागावाटपावर अंतिम तोडगा न निघाल्यास महायुतीत काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, असे संकेत आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले आहेत. त्यामुळे उर्वरित जागांवर महायुती एकत्र लढणार, की आमनेसामने उभी ठाकणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.