नाशिक

जिल्हा बँक जिल्हा बँक

CD
सेकंड मेन (जळगाव जिल्हा बँकेचा फोटो वापरावा) ------- जिल्हा बँक निवडणुकीच्या तारखेची प्रतीक्षा ‘महायुती’त खलबते, महाविकास आघाडीही उभारणार पॅनल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २० : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना लागले वेध आहेत. ‘महायुती’तर्फे ही निवडणूक बिनविरोध करण्यावर खल सुरू आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने पनल उभे करण्याचे ठरविले असल्याने ही निवडणूक दुरंगी होण्याची चिन्हे आहेत. महायुतीतर्फे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील इच्छुकांनी संबंधित नेत्यांकडे आपल्याला संधी मिळाली पाहिजे, असा आग्रह धरला आहे. तर तिन्ही पक्षांना समान जागा देत सर्व जागांचे महायुतीचे उमेदवार कसे निवडून येतील, यासाठी रणनीती आखली जात आहे. संबंधित इच्छुकांनी त्या त्या विविध कार्यकारी सोसायटीसह इतर मतदार संघात आपला संपर्क वाढविल्याचे चित्र आहे. जे संचालक दहा वर्षे संचालक होते, त्यांनी मतदारांना आमच्या कुटुंबातील उमेदवार रिंगणात असतील, असे सांगितल्याचे बोलले जात आहे. संचालक मंडळाची मागील पंचवार्षिक निवडणूक २१ नोव्हेंबर २०२१ ला झाली होती. यंदा ती तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. असे असले तरी इच्छुकांचा गाठीभेटीवर भर सुरू आहे. बँकेच्या निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी १४ ऑक्टोबरला अधिकृतपणे ऑनलाइन जाहीर झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या तीन प्रमुख पक्षांच्या महाविकास आघाडीने एकत्रित येऊन निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे ठरविले आहे. यामुळेही निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे निश्‍चित आहे. चौकट दिग्गजांचे कुटुंबीय रिंगणात यंदा पंचवार्षिक निवडणुकीत सलग दहा वर्षे संचालक असलेले अपात्र ठरणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे विद्यमान मातब्बर संचालकांनी अगोदरच कुटुंबीयांतील सदस्यांच्या नावाचे ठराव करून घेतले आहेत. आता या दिग्गजांचे कुटुंबातील सदस्य रिंगणात उतरतील. ------ निवडणूक लढविता न येणार मातब्बर संभाव्य निवडणुकीमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला असून, उमेदवारांची चाचपणी, गटबाजी आणि पॅनेलच्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, विद्यमान अध्यक्ष संजय पवार, संचालक एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार चिमणराव पाटील, आमदार अनिल पाटील, ॲड. रवींद्र पाटील यांच्यासह नऊ संचालकांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची संधी मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: आंदोलनाबाबत अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा! आता दिवाळीपर्यंत...

मी अजूनची चांगल्या फॉर्मात आहे, मग भारतीय संघात पुनरागमनाची आशा का सोडू? मोहम्मद शमीचं विधान चर्चेत...

Space War : मोबाईलचे जाळे आणि जीपीएस होणार गुल? अवकाशातील वाढत्या संघर्षामुळे जगासमोर मोठे संकट!

Latest Marathi News Live Update : धनंजय मुंडेंचा फार सहन केलं, 'अब हवा का रुख बदल रहा है' म्हणत कोणाला इशारा?

PAK vs ENG : बाबर आझम पुन्हा फेल गेला... पण, एक असा विक्रम ज्यात शुभमन गिलच्या पंक्तीत जाऊन बसला; Video

SCROLL FOR NEXT