नाशिक

अखेर जिल्‍हा परिषदेला प्राप्‍त

CD
सहा वर्षांपासून थकीत रक्कम अखेर जिल्‍हा परिषदेला प्राप्‍त (उपशीर्षक) दीपनगर औष्णिक वीज केंद्राकडून ७.९६ कोटींचा धनादेश सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक वीज केंद्राकडे जिल्हा परिषदेची सहा वर्षांपासून करापोटी रक्‍कम थकित होती. साधारण सात कोटी ९६ लाख सात हजार ६०० रुपयांची कराची थकबाकी अखेर जमा झाली. दीपनगर औष्णिक वीज केंद्राकडून प्राप्‍त धनादेशातील ३० ऑक्टोबरला रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राकडून जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाला २०१९-२०२० पासून २०२६-२०२७ या कालावधीतील कराची थकबाकी येणे बाकी होती. वेळोवेळी मागणी करूनही ही रक्कम जमा होत नव्हती. त्यामुळे मानवाधिकार परिषदेचे युवा विभागाचे अध्यक्ष सुरज नारखेडे यांनी याप्रकरणी लेखी तक्रार दाखल करून थकबाकी वसुलीसाठी पाठपुरावा सुरूच ठेवला होता. अखेर रक्‍कम वर्ग नारखेडे यांनी सुरू ठेवलेल्‍या पाठपुराव्‍याच्‍या प्रयत्नांनंतर ३० ऑक्टोबरला पंचायत समिती भुसावळमार्फत थकबाकीची ७ कोटी ९६ लाखाची रक्कम वर्ग करण्यात आली. याबाबत भुसावळचे गटविकास अधिकारी यांनी पत्राद्वारे नारखेडे यांना माहिती दिली आहे. तब्बल सात कोटी ९६ लाख सात हजार ६०० रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्याने ग्रामीण भागातील विकासकामांसाठी मोठा आर्थिक आधार उपलब्ध झाला आहे. चौकट विकासकामांसाठी मदत जिल्हा परिषदेच्या हक्काची ही रक्कम गेल्‍या सहा वर्षांपासून प्रलंबित होती. जिल्‍हा परिषद प्रशासनाकडून वसुलीसाठी विलंब होत होता. परंतु, नारखेडे यांच्‍या प्रयत्‍नांमुळे रक्‍कम वसुली झाली असून सदरची रक्‍कम वसूल झाल्याने आता ग्रामीण भागातील विविध विकासकामांना गती मिळण्यास मदत होणार आहे. या वसुलीसाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे नारखेडे यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे मानले जात आहे. –––––––––

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surakumar Yadav: सूर्यकुमार पुन्हा झाला कर्णधार! BCCI च्या T20 स्पर्धेत करणार मुंबईचं नेतृत्व

Amba River Pollution: अंबा नदीचे पाणी शेवाळ आणि केमिकलमुळे प्रदूषित; पालीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

Oil Price: कच्च्या तेलाचे दर आठवडाभरात १७ टक्क्यांनी घसरले; भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Maharashtra Live News: ‘दिमागी नक्षल’ वक्तव्यावरून राहुल गांधींचे मोदींना पुन्हा चर्चेचे आव्हान

भारतातील एका वर्षाच्या आठवणींनी परदेशी पर्यटक भावुक; 'या देशाने जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला'

SCROLL FOR NEXT