office esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: दिंडोरीच्या प्रांतने केली तब्बल 40 लाखांच्या लाचेची मागणी; ACBची कारवाई, गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : दिंडोरीचे प्रांताधिकारी निलेश अपार यांनी खासगी कंपनीची जमीन एनए करण्यासाठी ४० लाख रुपये लाचेची मागणी केली.

याप्रकरणी तक्रारदाराच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने प्रांत अपार यांच्याविरोधात दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (District prant officer of Dindori Demands Bribe of Rs 40 Lakhs ACB action case registered Nashik Bribe Crime)

दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत निलेश अपार (३७, रा. स्वामी बंगला, शासकीय विश्रामगृह, दिंडोरी) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. ५७ वर्षीय तक्रारदारानुसार, त्यांची दिंडोरी येथे कंपनी आहे.

या कंपनीचे बांधकाम करताना त्यांनी अकृषीक परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे प्रांत अपार यांनी कंपनीस नोटीस बजावण्यात आली होती. तसेच कंपनीचे उत्पादन बंद करण्याबाबत तोंडी सांगितले होते.

सदर कंपनीवर कारवाई न करण्यासाठी, तसेच बंद कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी तक्रारदाराकडे प्रांत अपार यांनी ५० लाखांची मागणी केली. तडजोडी अंती ४० लाख रुपयांची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी प्रांत अपार यांनी दर्शविली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याप्रकरणी तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपतच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली.

दरम्यान तक्रारदाराने लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी वेळकाढूपणा होत असल्याने ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दिंडोरी पोलिसात प्रांत अपार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई ‘लाचलुचपत’च्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलीस निरीक्षक संदिप साळुंखे, डोंगरे, इंगळे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT