Candidates of the Co-operation Panel cheering after winning the five-year election of the Board of Directors of Nashik District Government and Parishad Bank. esakal
नाशिक

Nashik Bank Election: जिल्हा सरकारी व परिषद बॅंक पदाधिकारी निवडीवरून संचालकांमध्ये खदखद

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bank Election : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बॅंक अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक बाळासाहेब ठाकरे-पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी महेश मुळे यांची निवड झाल्यावर आता संचालक मंडळात नाराजी नाट्य सुरू झाले आहे.

अनेक संचालकांनी या निवडीवर आक्षेप घेत विरोध दर्शविला. दुसरीकडे, सभासदांकडूनही संचालकांकडे या निवडीवर नाराजी व्यक्त केली जाते. काही संचालकांनी यावर आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. (Disturbance among directors over election of district government and council bank officers nashik)

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया बुधवारी (ता. १९) पार पडली. सहकार पॅनल सत्तेत आल्यावर पदाधिकाऱ्यांची पहिलीच निवड होती. मात्र, या निवडीप्रसंगी पडद्याआड नाराजी नाट्य रंगले होते.

पडद्याआड असलेली संचालकांमधील नाराजी आता खुलेआम पुढे येऊ लागली आहे. कोअर कमिटीने पारदर्शकपणे निवड केली नसल्याचा आरोप संचालकांनी या वेळी केला. सर्व संचालकांची मते जाणून निवड होण्याची परंपरा असताना, कोअर कमिटीने थेट नाव लादल्याचा आरोपही काही संचालकांनी केला आहे.

कोअर कमिटीत जिल्हा परिषद केडरमधील केवळ एक ज्येष्ठ सदस्य होते. सर्व सदस्य हे स्टेट केडरचे असल्याने जिल्हा परिषदेवर अन्याय झाल्याचे एका संचालकांनी नाव न छापण्याच्या बोलीवर सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कोअर कमिटीकडून आलेल्या नावाला १५ हून अधिक संचालकांचा खुला विरोध होता. सभासदांकडूनही या निवडीवर नापसंती व्यक्त केली असून, मोबाईल तसेच मेसेजद्वारे सभासद भावना पोचवत असल्याचे एका संचालकाने सांगितले.

त्यामुळे या पदाधिकाऱ्यांविरोधात रोष वाढत असल्याने संचालक मंडळाची बैठक घेण्याची तयारी संचालकांनी केली असल्याचे वृत्त आहे. यात पुढील दिशा ठरविली जाणार असल्याची चर्चा आहे.

त्यामुळे सभागृहात असलेले नाराजी नाट्य आता उघडपणे बाहेर आले असल्याने संचालक मंडळात असंतोष असल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Talaq-e-Hasan Case: मुस्लिमांमध्ये तलाक-ए-हसन म्हणजे काय? ऐकून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशही संतापले, नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Update LIVE : पक्षातून हकालपट्टी होताच ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर

Ethanol Plant Fire Explosion: उदापूर इथेनॉल प्लांटला भीषण आग; स्फोटाने ब्रह्मपुरीसह तीन गावे हादरली

Buldhana News: दोघांच्या त्रासाला कंटाळून; नांदुरा तालुक्यात ५० वर्षीय व्यक्तीने संपवले जीवन

Ahilyanagar News:'अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पॅचिंग पे पॅचिंग'; तीन वर्षात तीनदा दुरुस्तीसाठी १५ कोटी खर्चले..

SCROLL FOR NEXT