Disturbance in written paper examination Department of Education send notice to school
Disturbance in written paper examination Department of Education send notice to school esakal
नाशिक

चालू पेपर मधून विद्यार्थ्यांना उठविले; शाळेला कारणे दाखवा नोटीस

सकाळ वृत्तसेवा

चांदवड (जि. नाशिक) : गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चांदवड येथील नेमिनाथ जैन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क (Tuition fees) भरले नाही, म्हणून विद्यार्थ्यांना पेपर सुरू असताना उठवून दुसऱ्या वर्गात बसविले होते. या गंभीर प्रकाराची तक्रार पालकांनी शिक्षण विभागाकडे (Department of Education) केली होती. शिक्षण विभागाने चौकशी पूर्ण केली आहे. त्यानंतर शाळेची मान्यता का काढून घेऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एम. व्ही. कदम यांनी बजावली आहे. मुख्याध्यापिका मारणे यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाकाळात दोन वर्षे शाळा बंद होत्या. मात्र, गेल्या वर्षी सप्टेंबरच्या दरम्यान तुरळक ठिकाणी शाळा सुरू होऊ लागल्या. त्या वेळी संस्थेत शाळा सुरू झाल्यावर एक महिन्यात आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली. त्यातील काही विद्यार्थ्यांनी फी भरली नाही म्हणून त्यांना पेपेर सुरू असताना उठवून दुसऱ्या वर्गात बसवून ठेवल्याने ते परीक्षेपासून वंचित राहिले. याबाबत पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली. शिक्षण विभागाने सदर संस्थेचे कामकाज तपासले असता, त्यात अनियमितता आढळून आली. त्यात एसएनजीबी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कार्यरत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मान्यता संस्थेने घेतलेल्या नसल्याचे समोर आले.

शिक्षक, कर्मचारी यांना वेतनाबाबत माहिती नाही. कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश दिलेले नाहीत. विद्यार्थ्यांना फी संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. संचमान्यता आदेश परवानगीबाबत कोणतेही दस्तऐवज उपलब्ध नाही. मुख्याध्यापकांना संस्थेने नियुक्ती दिली, परंतु वैयक्तिक मान्यता घेतलेली नाही. विद्यार्थ्यांचे फी बाबत पालक-शिक्षक संघाकडून मंजुरी घेण्यात आलेली नाही. शाळेने लेखापरीक्षा अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने अनियमितेचा ठपका ठेवत शाळेला मान्यता का काढून घेऊ नये, अशी नोटीस बजावली आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांची उचित कारवाई

"या संस्थेच्या मुजोरीविरुद्ध मी सहा महिने लढा दिला. ज्ञानदानाऐवजी त्यांनी शिक्षणाचा बाजार मांडून विद्यार्थी आणि पालकांची अक्षरशः लूट चालविली होती. मात्र, शिक्षण अधिकाऱ्यांंनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता उचित कारवाई केली. शाळेच्या मुख्याध्यापिका 65 वयाच्या आहेत, याचीही चौकशी व्हायला हवी."

- शांताराम घुले, तक्रारदार पालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT