Officials and employees of Zilla Parishad cleaning the banks of Godavari river at Lakhalgaon in Nashik taluka esakal
नाशिक

Nashik News : सांडपाण्याचा थेंब गोदावरीमध्ये जाता कामा नये : विभागीय आयुक्त गमे

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यात गोदावरीचा उगम असून गोदावरीचे प्रदूषण होऊ न देता तिचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सातत्याने काम करणे आवश्यक असून गोदावरी नदीकाठावरील प्रत्येक गावाने सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करून सांडपाण्याचा एकही थेंब गोदावरीमध्ये जाणार नाही, या साठी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. (Divisional Commissioner Game statement sewage water should not go into Godavari Nashik News)

स्वच्छ भारत अभियान (ग्रा) जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत सोमवारी (ता. २) नाशिक तालुक्यातील लाखलगाव येथे गोदावरी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरावरील खातेप्रमुख उपस्थित होते.

विभागीय आयुक्त गमे म्हणाले की, गोदावरी नदी स्वच्छता हे एका दिवसाचे काम नसून या कामात सातत्य गरजेचे आहे. महानगरपालिका, ग्रामीण भागातील गोदाकाठावरील सर्व गाव यांनी गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नियोजनपूर्वक काम करण्याची आवश्यकता आहे.

ग्रामीण भागातील नदी काठावरील सर्व गावांनी सांडपाणी व घनकच-याच्या उपाययोजना कराव्यात, प्लॅस्टिकचे योग्य व्यवस्थापन करावे व गोदावरी नदी प्रदूषित होणार नाही यासाठी जनजागृती करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात १ मे ते ४ मे पर्यत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतंर्गत १ मे रोजी कार्यालय स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

जिल्ह्यात ठिकठिकाणी एकाच वेळी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. निफाड तालुक्यात चांदोरी येथे नदीकाठाची स्वच्छता करण्यात आली. लाखलगाव येथे आयोजित मोहिमेत गोदावरी नदीतून पानवेली काढण्यात आल्या तसेच गोदाकाठाची स्वच्छता करण्यात आली.

या मोहिमेत अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ यांनी सहभागी होत श्रमदान केले. या स्वच्छता मोहिमेसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ,

ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णूपंत गर्जे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे,

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, कृषी अधिकारी मयूरी झोरे, गटविकास अधिकारी सारिका बारी, सरपंच आत्माराम दाते, ग्रामसेवक नरेंद्र शिरसाठ यांच्यासह कर्मचारी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT