Divya Gund passed the UPSC exam Sakal
नाशिक

यूपीएससी परीक्षेत दिव्याचे यश; आई-वडिलांपाठोपाठ होणार अधिकारी

अरुण मलाणी

नाशिक : दहावीत तब्‍बल ९२ टक्‍के गुण मिळविल्‍यानंतरही तिने कला शाखेत अकरावीसाठी प्रवेश घेतला. शालेय जीवनापासून अधिकारी होण्याचे स्‍वप्‍न बघण्यास सुरवात केली व स्‍वप्‍नांचा पाठलाग सुरू ठेवला. यूपीएससी परीक्षेत यश मिळविताना अखेर दिव्‍या अर्जुन गुंडे हिने स्‍वप्‍नपूर्ती केली. आई-वडील प्रशासकीय सेवेत असल्‍याने आता गुंडे कुटुंबात दिव्‍याच्‍या रूपाने तिसरी दिव्‍याची गाडी दाखल झाली आहे.


दिव्‍याचे शालेय शिक्षण फ्रावशी ॲकॅडमीत झाले. आयपीएसई बोर्डातून तिने दहावीत ९२ टक्‍के गुणांसह यश मिळविले. परंतु शालेय जीवनापासून अधिकारी होण्याचे स्‍वप्‍न उराशी बाळगताना तिने जाणीवपूर्वक कला शाखेची निवड केली. बारावीपर्यंत एचपीटी महाविद्यालयातून शिक्षण घेतल्‍यानंतर पुढे पदवीकरिता पुण्यातील फॉर्गिसन कॉलेजची निवड केली. अंतिम वर्षात असल्‍यापासून स्‍पर्धा परीक्षांना सुरवात केली.


आई जिल्‍हाधिकारी, वडील अतिरिक्‍त सीईओ

दिव्‍याची आई नयना गुंडे सध्या गोंदियात जिल्‍हाधिकारी आहेत, तर वडील अर्जुन गुंडे नाशिक जिल्‍हा परिषदेत अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. प्रशासकीय सेवेतील अनुभवासोबत दिव्‍याला स्‍पर्धा परीक्षांच्‍या तयारीकरिता आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले.

नाशिकमध्ये घडले व्यक्‍तिमत्त्व

आजवरच्‍या प्रवासात शालेय जीवन महत्त्वपूर्ण होते. या कालावधीत व्यक्‍तिमत्त्व विकास घडल्‍याचे दिव्‍याने सांगितले. आयसीएसई बोर्डातील शिक्षणक्रमामुळे अभ्यासाचा पाया भक्‍कम झाला. कला शाखेच्‍या निवडीचाही फायदा झाल्‍याचे तिने नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT