Rangoli Seller esakal
नाशिक

Diwali 2022 : सप्तरंगातून उजळले रांगोळीचे सौंदर्य

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : उत्‍सव, सण आणि रांगोळीचे नाते अविभाज्‍य आहे. दिवाळीची चाहूल लागताच महिलांची घर सजावटीची लगबग सुरू होते. महिलांसाठी दिवाळीतील आवडता विषय म्‍हणजे अंगणात काढलेली रांगोळी. रांगोळी काढण्‍यासाठी लागणारे साहित्‍यात ठसा प्रकारास महिलांची पसंती लक्षात घेता बाजारात विविध आकाराचे तसेच नक्षीचे ठसे उपलब्‍ध आहेत. (Diwali 2022 Rangoli colors literature preferred by women Nashik Latest Marathi News)

सणात अंगणातील रांगोळी काढणे जणू काही स्‍पर्धाच असते. शेजारील रांगोळीपेक्षा आपली रांगोळी मोठी व सुबक असावी, अशी प्रत्‍येक महिलेची इच्‍छा असते. अंगणातील रांगोळीने घरात प्रवेश करताना प्रत्‍येक क्षणी मन प्रसन्न होते, घराचे सौंदर्य अधिक खुलते. सण- उत्‍सवाच्या काळात छोट्या- मोठया उद्योगातून रोजगार मिळत असतो.

मुख्य बाजारपेठ, मेनरोड येथील वावरे लेन येथील रांगोळीच्या होलसेल दुकानात रांगोळी खरेदीसाठी महिलांची गर्दी होत आहे. रांगोळी आकर्षक, तसेच रांगोळीचे सौंदर्य खुलविण्‍यासाठी विविध रंगांचा उपयोग केला जातो. दुकानात ५० ते ६० प्रकारातील विविध रंग उपलब्‍ध आहेत. तसेच रांगोळी अधिक आकर्षक होण्‍यासाठी रांगोळीवर चंदेरी तसेच सोनेरी प्रकारातील चमकीचा वापर केला जातो.

तसेच, रांगोळीच्या ठशांमध्ये विविध प्रकार आहेत. रांगोळी काढण्‍यासाठी लागणारे साहित्‍य यात विशेषतः ठसा प्रकारास महिलांची पसंती आहे. सध्या खरेदीत महिला दंग झाल्‍या आहेत. राजस्‍थान येथील रांगोळीला जास्‍त मागणी आहे. कारण तेथील रांगोळीचा रंग जास्‍त गडद असल्‍याने फिके पडण्याचा संभव नसतो.

रांगोळीसाठी लागणारे साहित्‍य

विविध आकारातील पेन, रंग भरण्यासाठी डबी, विविध आकारातील बाटली. ठसा प्रकार : चक्री जाळीचा ठसा यात १० इंची ते ५० इंची, पट्टी ठसा दारात काढण्यासाठी याचा झालर वा तोरण प्रकारातील ठसा, लक्ष्मीच्या पावलांचे विविध प्रकारचे ठसे, प्लॅस्टिक जाळीचे चौकोनी स्‍वरूपातील ठसा, तसेच लाकडी भुश्‍याच्या पुठयापासून बनविलेला पट्टी आकारातील ठसा.

रांगोळीचे दर

साधी रांगोळी १० रुपये किलो

रंग रांगोळी १५ ते २० रुपये अर्धा किलो

साहित्‍याचे दर : विविध आकारातील रांगोळी पेन २० पासून ५० रुपयापर्यंत

रांगोळी ठसे डबी प्रकार १० पासून ६० रुपयापर्यंत, आकारानुसार रांगोळी जाळी १५ पासून २७० रुपयांपर्यंत

रांगोळी प्लॅस्टिक जाळी तसेच साधी जाळी २० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत

कोरोनानंतरचा पहिला सीझन म्हणण्यास हरकत नाही. ग्राहकांची दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी यामुळे समाधानकारक स्‍थिती आहे. तसेच महिलांची ठसा रांगोळी प्रकाराला जास्‍त पसंती असल्‍यामुळे ठशांचे विविध प्रकार साईजप्रमाणे उपलब्‍ध आहे.

- राखी पाटील, विक्रेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT