धुळे : टुडे पान २ साठी... मेन
--
(लोगो : आली दिवाळी)
फोटो क्रमांक : 34325, 34326
धुळे : दिवाळीच्या सणानिमित्त शहरातील बाजारपेठेत रंगीत रांगोळ्या खरेदी करताना महिला. दुसऱ्या छायाचित्रात सजावटीसाठी बाजारात दाखल झालेल्या आकर्षक रांगोळी साचे, डिझाईन्सची पाहणी करताना महिला. (छायाचित्रे : गोरख गर्दे)
--
आकर्षक रांगोळ्यांनी उजळली दिवाळी बाजारपेठ
--
रेडिमेट साचे, स्टेंसिल अन् आकर्षक रंगांमुळे वेळेची बचत; बाजारपेठा गजबजल्या
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २ : दिवाळीचा सण जसजसा जवळ येत आहे तसतसा शहरातील बाजारपेठा सजावटीच्या विविध साहित्याने आणि चैतन्याने ओसंडून वाहू लागल्या आहेत. घराच्या अंगणात, उंबरठ्यावर आणि देवघरासमोर आकर्षक अन् सुबक रांगोळी काढण्यासाठी महिलावर्गाकडून रंगीत रांगोळीचे रंग, रेडिमेट रांगोळ्या, स्टेंसिल तसेच विविध नवनवीन आकारांतील सजावटीच्या साहित्याला पसंती दिली जात आहे. नोकरी, व्यवसाय आणि घरकाम सांभाळणाऱ्या महिलांसाठी वेळेची बचत आणि कमी कष्टांत सुंदर रांगोळी साकारता येत असल्याने हे रेडीमेड पर्याय सोयीचे ठरत आहेत.
-
बाजारात यंदा पारंपरिक ठिपक्यांच्या रांगोळ्यांबरोबरच फुलांच्या नक्षी, कमळ, स्वस्तिक, लक्ष्मीची पावले, मोर आणि दीपांच्या आकारातील रांगोळ्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. स्टेंसिलच्या मदतीने कमी वेळेत एकसारखी आणि सुबक नक्षी काढणे सोपे होत असल्याने महिलांचा कल या आधुनिक पद्धतींकडे अधिक वाढला आहे. याशिवाय ठिपक्यांच्या नक्षीचे साचे, रंग भरण्यासाठी तयार डिझाईन्स, विविध आकारांतील रांगोळी संच बाजारपेठांचे आकर्षण ठरत आहेत. सध्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा दरांमध्ये रांगोळी साहित्य उपलब्ध आहे. बाजारातील उपलब्ध दरानुसार पांढरी रांगोळी १० रुपये प्रतिकिलो, रंगीत रांगोळी २० रुपये प्रति किलो, छापे किंवा पारंपरिक साचे १०० रुपये प्रति नग, तर स्टिकर्स १०० ते १५०-२०० रुपये पर्यंत उपलब्ध आहेत. बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिलांची गर्दी होत असून, दिवाळीच्या स्वागताची ही तयारी शहरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करत आहे.
-
१४-१
..चौकट..
१४-१
विविध रांगोळी साचे
प्रकाशपर्व असलेल्या दिवाळीनिमित्त बाजारपेठेत यंदा अवघ्या २० ते ५० रुपयांपर्यंत मिळणारे वूडन रांगोळी साचे, भिंत सजावणारी लिपन आर्ट रांगोळी ही नवीन उत्पादने दाखल झाली आहेत. कमी वेळेत अचूक पद्धतीने रांगोळी रेखण्यासाठी महिलावर्गाकडून या नवीन संकल्पनांना मागणी आहे. या लाकडी साच्यांमध्ये पणती, सरस्वती, गोपद्म, स्वस्तिक, गाय- वासरू, लक्ष्मीची पावले आणि विविध प्रकारच्या फुलांचे पारंपरिक तसेच आधुनिक पर्याय उपलब्ध आहेत. रांगोळ्यांच्या रंगांमध्ये यंदा विविधता पाहायला मिळत आहे. विशेषतः लक्ष्मीची किंवा विविध मानवी आकृत्यांची रांगोळी साकारताना चेहऱ्यासाठी व त्वचेसाठी लागणाऱ्या ‘स्किनी’ (त्वचेच्या) रंगाला महिलावर्गाकडून पसंती मिळत आहे. यामुळे रांगोळीतील कलाकुसर अधिक सजीव आणि देखणी दिसत आहे.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.