नाशिक

आधाराश्रमातील बाळाला लाभले परदेशी पालक

CD
चिमुकल्याच्या आयुष्याला लाभला मायेचा उजेड --- अमेरिकेतील दांपत्याने घेतले बालकाला दत्तक, दिवाळी ठरली अविस्मरणीय सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १२ : दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा सण... नात्यांमधील प्रेम अधिक घट्ट करण्याचा आणि माणुसकीचा दिवा मनामनांत पेटविण्याचा उत्सव! याच दिवाळीत आधाराश्रमातील एका चिमुकल्याच्या आयुष्यातही नव्या आशेचा प्रकाश उजळला. अमेरिकेतील दांपत्याने या बालकाला दत्तक घेत त्याला प्रेमळ कुटुंबाची ऊब आणि मायेचा आधार दिला. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत हा भावनिक क्षण घडला. त्यामुळे आधाराश्रमातील दिवाळी यंदा एका बालकाच्या आयुष्याला नवी दिशा देणारी ठरली. दत्तक प्रक्रियेबाबत जनजागृती व्हावी आणि अनाथ, निराधार बालकांना कुटुंबाचा आधार मिळावा, या उद्देशाने नोव्हेंबरमध्ये देशभरात दत्तक जागृती महिना साजरा केला जातो. याच उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी प्रसाद यांनी आधाराश्रमाला भेट देत बालकांबरोबर दिवाळीचा आनंद साजरा केला. मात्र, ही भेट केवळ सण साजरा करण्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर एका चिमुकल्याच्या आयुष्यात नवे नाते जोडणाऱ्या अविस्मरणीय क्षणाची साक्षीदार ठरली. या वेळी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी बालकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांना दिवाळी फराळाचे वाटप केले. बालकांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेले आकाशकंदील, पणत्या आणि विविध शोभेच्या वस्तू पाहून त्यांनी त्यांचे कौतुक केले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह आणि निरागसता पाहून त्यांनी बालकांची आस्थेने विचारपूस केली. जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थेला देणगीही प्रदान केली. या वेळी आधाराश्रमातर्फे तयार करण्यात आलेल्या दत्तकविषयक माहितीपुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने, संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर केळकर, सचिव हेमंत पाठक, कल्याणी दातार, संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. एका बाजूला दिवाळीच्या पणत्यांचा प्रकाश, तर दुसऱ्या बाजूला एका चिमुकल्याच्या आयुष्यात नव्याने उजळलेली कुटुंबाच्या मायेची ज्योत... या दोन आनंददायी क्षणांनी आधाराश्रमातील दिवाळी खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरली. कोट आधाराश्रमातील प्रत्येक बालकाचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी बालकांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश मिळवून द्यावा, तसेच विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. सक्तीचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे. हा अधिकार त्यांना मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे. संस्थेच्या कामकाजासाठी समाजानेही आर्थिक योगदान द्यावे. - आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक फोटो क्रमांक : एच 34909

Khopoli Bus Accident : बाजारपेठेत अर्धा किलोमीटर मृत्यूचा थरार! अनियंत्रित बसने अनेक वाहनांना उडवले; एका तरुणाचा करुण अंत!

Nvidia CEO Exit: ३३ वर्षांच्या प्रवासाला २ अफेअर्समुळे 'ब्रेक'! जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओचा तडकाफडकी राजीनामा; एआय जगताला हादरा

IRCTC Shimla-Manali Winter Special Tour Package : नोव्हेंबरच्या अखेरीस शिमला-मनाली फिरण्याची सुवर्णसंधी; IRCTC कडून 'विंटर स्पेशल टूर पॅकेज' जाहीर, टॉय ट्रेनचा प्रवास ते विमानाची सुविधा एकाच पॅकेजमध्ये

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

Latest Marathi News Live Update : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची शक्यता सतेज पाटलांनी फेटाळली; "मला १०० टक्के खात्री आहे, विलीनीकरण होणार नाही"

SCROLL FOR NEXT