धुळे : टुडे १ साठी...
--
खासगी बसची मनमानी रोखणार
दिवाळीत जादा भाडे आकारल्यास कारवाईचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ४ : दिवाळीचा आनंद आपापल्या माणसांसोबत साजरा करण्यासाठी नागरिक गावाकडे परततात. नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त घरापासून दूर असलेल्या प्रत्येकालाच सणाच्या दिवसांत घराची ओढ असते. मात्र प्रवाशांच्या या गरजेचा गैरफायदा घेत खासगी बसचालकांनी मनमानी भाडेवाढ करू नये. शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक प्रवासभाडे आकारल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी दिला आहे.
-
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आगामी ७ ते २० नोव्हेंबर या कालावधीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. या गर्दीचा गैरफायदा घेत काही खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून अवाजवी भाडे वसुली केली जाण्याच्या शक्यतेमुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रवाशांच्या हिताची खबरदारी घेतली आहे. शासनाने निर्धारित केलेल्या भाडेदरांचे काटेकोर पालन करणे त्यांना बंधनकारक आहे. विशेषतः दिवाळीच्या सुट्यांमध्ये विविध शहरांतून गावाकडे जाणाऱ्या आणि सुटीनंतर परतणाऱ्या प्रवाशांची गर्दी होत असते. अशा वेळी प्रवाशांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये आणि त्यांच्यावर अनावश्यक अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, यासाठी सर्व वाहतूकदारांनी नियमांचे पालन करावे, असे निर्देश आहेत.
-
१४-१
...चौकट...
१४-१
तक्रार नोंदवता येणार
दरम्यान प्रवासासाठी निर्धारित केलेल्या शासकीय दरापेक्षा अधिक भाड्याची मागणी झाल्यास प्रवाशांनी थेट प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रार करताना प्रवाशांनी प्रवासाचे अधिकृत तिकीट, आकारलेल्या भाड्याचा तपशील आणि उपलब्ध असलेले सर्व पुरावे सोबत सादर करणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी rto.18-mh@gov.in या ई-मेलवर किंवा धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ०२५६२- २८१३५१ या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्राप्त सर्व तक्रारींची तरतुदींनुसार पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे श्री. पवार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.