नाशिक

दिवाळीसाठी बसेस सज्ज

CD
धुळे : टुडे पान १ साठी... अँकर --लोगो : (आली दिवाळी) दिवाळीसाठी धुळे विभागातील ७४५ बसेस सज्ज -- प्रवाशांसाठी विशेष नियोजन; पुणे, मुंबईसह विविध मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या -- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २९ : दिवाळी सणात प्रवाशांना गावी जाणे सुकर व्हावे आणि परतीच्या प्रवासात कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाच्या धुळे विभागाने जय्यत तयारी केली आहे. धुळे विभागातील ७४५ बसेस दिवाळीच्या काळात प्रवाशांच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा ताण लक्षात घेता विभागातर्फे दररोज साधारण तीन लाख किलोमीटर बस चालवण्याचे आणि त्यातून अंदाजे सव्वा कोटी रुपये उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी दिली. दिवाळीमध्ये गावी जाण्यासाठी आणि दिवाळीनंतर पर्यटनाला जाणाऱ्या नागरिकांची धावपळ असते. दिवाळीसाठी गावी येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळ, खासगी बस आणि खासगी टॅक्सी हे पर्याय उपलब्ध आहेत. या काळातील प्रवाशांची वाढती संख्या पाहून एसटी महामंडळाने प्रमुख शहरांसाठी एक ते २० नोव्हेंबर या काळात ११३ जादा बसस सोडण्याचे नियोजन केले आहे. गर्दीप्रमाणे जादा बस वाढविल्या जाणार आहेत. सध्या शाळा सुरू असल्यामुळे धुळे विभागातील ११३ बसेस शाळांच्या फेऱ्यांवर कार्यरत आहेत. शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर झाल्यानंतर या अतिरिक्त बसेस विविध मार्गांवर प्रवाशांच्या दिमतीला उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भागातील जनतेलाही सहज प्रवास करता यावा, यासाठी ग्रामीण शटल फेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. एक तारखेपासून या सर्व अतिरिक्त गाड्यांचे नियोजन प्रत्यक्षात अमलात आणले जात आहे. दरम्यान दरवर्षी दिवाळीच्या हंगामात एसटी महामंडळातर्फे हंगामी भाडेवाढ केली जाते, परंतु, यासंदर्भात यंदा अद्यापपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. - १४-१ ..चौकट.. १४-१ शहरांसाठी विशेष गाड्या तालुका ते जिल्हा आणि ग्रामीण भागापर्यंत सर्वदूर अतिरिक्त बसेस सोडण्याचे नियोजन आहे. प्रत्येक आगारातून नाशिक, पुणे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख मार्गांवर अतिरिक्त बस धावणार आहेत. याशिवाय पुणे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सुरत, पंढरपूर आणि अहमदाबाद या लांब व मध्यम पल्ल्याच्या मार्गांवर जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळातर्फे आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुणे येथून येणाऱ्या आणि परतीच्या प्रवासासाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej (Bunty) Patil on Hasan Mushrif Gokul : 'त्यांना गोकुळ दूध संघच बंद पाडायचाय!' हसन मुश्रीफांच्या टीकेनंतर बंटी पाटलांचा थेट आरोप, 'सहकारातील काळा दिवस' म्हणत मांडली रोखठोक भूमिका!

iPhone Duo Screen Issue: Apple iPhone Duoच्या स्क्रीनला तडे! कंपनीकडून रिप्लेसमेंट मिळणार का? नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

Latest Marathi News Update: पिंपरी-चिंचवड महापालिकेत मुख्य अभियंता प्रवीण ओंबासे एसीबीच्या जाळ्यात

Gokul Chairman Election : 'नविद मुश्रीफ यांच्या नावाचं पाकीट दिलं, तेव्हा मी जातीवादी नव्हतो का?'; सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना सवाल, थेट पुराव्यासह उघड केली जुनी बात

Pradeep Purnekar Case: ''तुम्ही पळून गेलात, तुमच्यात हिंमत नाही..'', पूर्णेकर हत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संताप, पोलिस तपासावरही आक्षेप

SCROLL FOR NEXT